शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चार शिक्षकांच्या जात वैधतेची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:03 IST

अकोला : जातवैधता नसल्याने मूळ जिल्हय़ात परत  पाठविण्याच्या कारवाईतून वाचवण्यात आलेल्या चार  शिक्षकांच्या प्रकरणांचा पडताळणीसह अहवाल तातडीने सादर  करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती  यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना मंगळवारी  दिला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले, हे  विशेष.

ठळक मुद्देधास्तावलेल्या शिक्षकांची जिल्हा परिषदेत धावएकाच जातीचा दोन प्रवर्गात समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जातवैधता नसल्याने मूळ जिल्हय़ात परत  पाठविण्याच्या कारवाईतून वाचवण्यात आलेल्या चार  शिक्षकांच्या प्रकरणांचा पडताळणीसह अहवाल तातडीने सादर  करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती  यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना मंगळवारी  दिला. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले, हे  विशेष. बिंदूनामावलीशी संबंधित काम करणारे कर्मचारी सुटीवर  असल्याने ते रुजू होताच पडताळणी केली जाईल, असे  दिग्रसकर यांनी सांगितले. त्या चौघांच्या नावानिशी चौकशी होत  आहे. शिक्षकांना नियुक्ती दिल्यानंतर संवर्गनिहाय बिंदूनामावली  पंजीमध्ये चुकीची माहिती देणे, तसेच चुकीच्या पद्धतीने  नोंदवहय़ा अद्ययावत करून विभागीय आयुक्तांच्या अखत्यारी तील मागासवर्ग कक्षाची दिशाभूल करीत मंजुरी घेण्यात  आल्याचा प्रकार २00७ नंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा त घडला आहे. विशेष म्हणजे, कोळी महादेव ही जात एकीकडे  विशेष मागास प्रवर्गात, तर दुसरीकडे अनुसूचित जमातींमध्येही  समाविष्ट आहे. पदभरती करताना समतोल न ठेवल्यामुळे उ पलब्ध पदे आणि अनुशेषाचा मोठा घोळ झाला आहे. त्यामध्ये  प्रवर्गनिहाय रिक्त पदे, सेवानवृत्तीने रिक्त पदे, मृत्यूमुळे रिक्त,  आंतरजिल्हा बदलीने गेलेले व आलेल्यांची वर्षनिहाय उपलब्ध  माहितीच नसणे, त्यातून पदभरतीमध्ये समतोल साधणे अशक्य  झाले. या सगळ्या प्रकारानंतर जिल्हा परिषदेने विभागीय आयुक् तांच्या मागासवर्ग कक्षाचीही दिशाभूल केली. बिंदूनामावलीसाठी  चुकीची माहिती दिली व त्यां चार शिक्षकांना वाचवण्याचा घाट  घालण्यात आला आहे. याबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी वृत्त  प्रसिद्ध केले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती,  शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी त्या चार शिक्षकांची नावे  शोधत संबंधितांना पुन्हा पडताळणी अहवाल सादर करण्याचे  बजावले. त्यामुळे आता त्या चौघांवर दाखवण्यात आलेली  मेहरबानी उघड होणार आहे. 

एकाच जातीचा दोन प्रवर्गात समावेशशिक्षण विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती देताना कोळी महादेव  जातीच्या उमेदवारांना एका ठिकाणी अनुसूचित जमातींमध्ये, तर  काही ठिकाणी विशेष मागास प्रवर्गात दाखवण्यात आले.  कायद्यानुसार संरक्षणाचे कवच नसलेल्यांनी जातवैधता सादर न  करताही नोकरीत ठाण मांडले आहे. ज्या चार शिक्षकांना  कारवाईतून वाचवण्यात आले. त्यापैकी एकाचा एका यादीत  विशेष मागास प्रवर्ग, तर दुसर्‍या यादीत अनुसूचित जमातींमध्ये  समावेश आहे. या गोंधळात वाचवण्याची संधी साधण्यात  आली. 

टॅग्स :Teacherशिक्षक