शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

गायरानातील अवास्तव माती उत्खननाची चौकशी सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 02:02 IST

अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात  निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त  मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्‍यांच्या  आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली.

ठळक मुद्देजिल्हा खनिकर्म अधिकारी-तहसीलदारांनी केली पाहणी‘रॉयल्टी’ आणि माती उत्खननाचे ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे निर्देश!

प्रभाव लोकमतचालोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या  रुंदीकरणासाठी (ब्रॉडगेज) अकोला शहरानजीक असलेल्या शिलोडा- कानडी रस्त्यावरील गायरानात  निकषापेक्षा जास्त मातीचे अवास्तव उत्खनन करण्यात येत असल्याचे वृत्त  मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर, जिल्हाधिकार्‍यांच्या  आदेशानुसार यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली. जिल्हा खनिकर्म  अधिकारी आणि अकोल्याच्या तहसीलदारांनी भेट देऊन, गायरानातील माती  उत्खननाची पाहणी केली.पूर्णा-खंडवा रेल्वे मार्गावरील अकोला ते अकोट रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाच्या  कामासाठी शिलोडा-कानडी रस्त्यालगत गट नं. ३८  व ३९ मधील सरकारी  जमिनीवर (गायरान) मातीचे उत्खनन करण्यात येत आहे. पुणे येथील राइट  इन्फ्रास्ट्रक्शन कंपनीमार्फत गायरान जमिनीवरील मातीचे उत्खनन करण्यात येत  असून, उत्खननाच्या निकषानुसार २0 फूट खोल मातीचे उत्खनन करण्याची  र्मयादा असताना, ३0 ते ३५ फूट खोल मातीचे उत्खनन करण्यात येत आहे.  यासंदर्भात २८ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या  आदेशानुसार गायरानातील मातीच्या उत्खननाची चौकशी २८ नोव्हेंबरपासूनच  सुरू करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड,  अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे, मंडळ अधिकारी नीळकंठ नेमाडे यांनी  शिलोडाजवळील गायरानात सुरू असलेल्या माती उत्खननाच्या ठिकाणी भेट  देऊन, माती उत्खननाची पाहणी करून माहिती घेतली.

‘रॉयल्टी’ आणि माती उत्खननाचे ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे निर्देश!उत्खननापोटी आतापर्यंत ‘रॉयल्टी ’ रक्कमेचा केलेला भरणा आणि मातीचे  करण्यात आलेले उत्खनन यासंदर्भात तीन दिवसात ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे  निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी व तहसीलदारांनी राइट इन्फ्रास्ट्रक्शन कं पनीच्या व्यवस्थापकांना दिले.

माती उत्खननाचे आजपासून मोजमाप!शिलोडा-कानडी रस्त्यावरील गायरानातील मातीच्या अवास्तव उत्खननाची  प्रशासनामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये २९ नोव्हेंबरपासून  माती उत्खननाचे मोजमाप सुरू करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयातील  संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांच्या चमूकडून माती उत्खननाचे मोजमाप  करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार शिलोडाजवळील गायरानातील माती उ त्खननाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. माती उत्खननासंदर्भात तीन  दिवसात ‘रेकॉर्ड’ सादर करण्याचे निर्देश संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांना  देण्यात आले असून, माती उत्खननाचे मोजमाप बुधवारपासून सुरू करण्यात  येणार आहे.- डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAkola cityअकोला शहर