शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पारस औष्णिक वीज केंद्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 14:51 IST

आता बोगस प्रमाणपत्रांवर प्रशिक्षण, नोकरी करणाºयांचे धाबे दणाणले आहे.

अकोला: पारस वीज निर्मिती केंद्रात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रावर नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये बोगस प्रमाणपत्रधारकांची संख्या मोठी असल्याच्या तक्रारी वीज निर्मिती कंपनीकडे झाल्याने, त्या सर्व तक्रारी चौकशीसाठी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, भूसंपादन अधिकाºयांकडे सादर केल्याचे महानिर्मिती पारस औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता बोगस प्रमाणपत्रांवर प्रशिक्षण, नोकरी करणाºयांचे धाबे दणाणले आहे.पारस औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात अनेक प्रशिक्षणार्थींचा भूसंपादनाशी काहीही संबंध नसताना त्यांना प्रकल्पग्रस्त असल्याचा लाभ देण्यात आला आहे. त्यामध्ये काहींनी मूळ मालकाचे नाव, अंतिम निवाड्यातील मूळ मालकाचे नाव, भूसंपादन होताना तलाठ्याने सादर केलेल्या सात-बारातील मूळ मालकाशी नाते असल्याचे दाखवून प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले आहे. भूसंपादनाच्या वेळी मूळ सात-बारा मालकाव्यतिरिक्त प्रकल्पग्रस्त असलेल्यांचे त्याच्याशी कोणतेही नाते नसणे, प्रकल्पग्रस्तांची नावे, त्यांच्या रक्ताच्या नातेसंबंधातील नाते कायद्यातील निकषाचे पालन न करणे, मूळ मालकांच्या दत्तकपुत्रांच्या वयातील अंतर, वारसाहक्काने मिळवलेले प्रमाणपत्रसाठी जाती बदलण्याचा प्रकार, भूसंपादित केलेल्या क्षेत्रफळाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देय मिळते की नाही, १९५६ ते १९५८ च्या काळात अनेकांना लाभ घेतला, त्यापैकी अनेक आताही लाभ घेत आहेत, त्यांना दुहेरी लाभ दिल्याचीही तक्रार आहे. त्यातच बाळापूर बॅरेज बुडीत क्षेत्रासाठी तीन हेक्टर दाखवण्यात आली. पाच हेक्टर संपादित करण्यात आली. हा प्रकार काहींनी संगनमताने केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला. याप्रकरणाची चौकशी झाल्यास मोठा घोटाळा उघड होणार असल्याचे निवेदनात तक्रारकर्त्यांनी म्हटले. त्यावर वीज निर्मिती प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी प्रकरणे चौकशीसाठी पाठवल्याचे पत्र दिले आहे. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयातून दिले जाते. त्याची वैधताही त्यांच्याकडून तपासली जाते. रिक्त जागांसाठी प्राप्त अर्जातून प्रकल्पग्रस्तांची गुणवत्तेनुसार निवड केली जाते. प्रकल्पग्रस्तांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासंदर्भात प्राप्त तक्रारी ९ व २२ आॅक्टोबर रोजी जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, अकोला यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :Paras Thermal Power Stationपारस औष्णिक विद्युत केंद्रAkolaअकोला