शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक भरतीतील पात्र उमेदवारांच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 12:22 IST

शिक्षण संस्था चालकांची बैठक घेऊन १९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले आहे.

- नितीन गव्हाळेअकोला: शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना अखेर दिलासा मिळाला असून, शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ७ आॅगस्ट रोजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये शिक्षक भरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षण संस्था चालकांची बैठक घेऊन १९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यास सांगण्यात आले आहे.अनेक महिन्यांपासून शिक्षक भरती होईल की नाही, याविषयी तर्क-वितर्क लढविण्यात येत होते. पात्र उमेदवारांकडून शिक्षक भरतीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. अखेर या चर्चेला आता विराम मिळणार असून, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांच्या मुलाखती आता लवकरच होणार आहेत. ७ आॅगस्ट रोजी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या उपस्थितीत राज्यभरातील सर्वच माध्यमिक शिक्षणाधिकाºयांच्या झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षक भरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळांतील पवित्र पोर्टलवर दिलेल्या जाहिरातीनुसार रिक्त असलेली पदे भरण्यासाठी उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. निवड समिती, शाळा समितीद्वारा महाराष्ट्र खासगी शाळांमधील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार उमेदवारांचे १/१0 प्रमाण असल्याने मुलाखतीचे नियोजन करण्यात येणार आहे. सोबतच वर्ग अध्यापन, मुलाखतीबाबत दस्तऐवज तयार करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. १९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्था लॉगिनवरपवित्र प्रणालीनुसार ज्या शिक्षण संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, अशा संस्थांना ९ आॅगस्ट रोजी मुलाखतीशिवाय शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्थांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार आहे. १६ आॅगस्ट रोजी (मुलाखतीद्वारे) निवड करावयासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी संस्था लॉगिनवर उपलब्ध होणार आहे.संस्थांनी पात्र उमेदवारांना माहिती द्यावी!शिक्षण संस्थांनी पात्र उमेदवारांना मुलाखतीचे ठिकाण, पत्ता, अध्यक्ष, सचिव यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करावेत आणि मुलाखतीच्या वेळी उमेदवारांना बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचेही निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.

४७ रिक्त पदांसाठी मुलाखतीजिल्ह्यात विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांची ४७ रिक्त पदे आहेत. या रिक्त पदांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करण्यात येणार आहे.

१९ ते ३0 आॅगस्टदरम्यान पात्र उमेदवारांच्या संबंधित संस्थांमध्ये मुलाखती घेण्यात येतील. त्यापूर्वी शिक्षक भरतीच्या दृष्टिकोनातून शिक्षण संस्थांनी राबविण्याच्या कार्यपद्धतीबाबत एक बैठक लवकरच बोलाविण्यात येणार आहे. त्यामध्ये संस्थेचे नाव, रिक्त पदे, मुलाखतीचे ठिकाण, उमेदवारांचे कागदपत्रे तपासणीचे ठिकाण, समन्वय अधिकाऱ्यांचे नाव आदी माहिती सादर करावी लागणार आहे.-प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTeachers Recruitmentशिक्षकभरती