शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा; पुणे, मुंबई, कोल्हापूर, अमरावती विद्यापीठांची आघाडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 13:00 IST

मुंबई विद्यापीठाने सिम्बॉयसिस विद्यापीठाला ४-० ने हरवित तर अमरावती विद्यापीठाने औरंगाबाद विद्यापीठाला ४-० ने मात देत आघाडी घेतली.

अकोला: पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीअखेर, पुरुष गटात, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने इंदूर विद्यापीठाला ४-० ने नमवित, मुंबई विद्यापीठाने सिम्बॉयसिस विद्यापीठाला ४-० ने हरवित तर अमरावती विद्यापीठाने औरंगाबाद विद्यापीठाला ४-० ने मात देत आघाडी घेतली.महिला गटात मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (नागपूर) यांनी भक्त कवी नरसिंह मेहता विद्यापीठ, दापोली विद्यापीठ, पाटण विद्यापीठ व जी.टी.यू. विद्यापीठ गुजरात यांचा सहज पराभव केला.अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा पहिल्या पटावर पुणे विद्यापीठाची अतिशय तुल्यबळ लढत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी चालू होती. दुसºया पटावर मुंबईची लढत जबलपूर विद्यापीठाशी रोमहर्षक स्थितीत चालू होती. पुरुष गटात तिसºया फेरीत एकूण दहा विद्यापीठे संयुक्तपणे आघाडीवर असून, महिला गटात नऊ विद्यापीठे ४ गुणांसह आघाडीवर आहेत. या स्पर्धेत फिडे मान्यताप्राप्त प्रवीण ठाकरे प्रमुख पंच असून, स्पर्धेची तांत्रिक मदतीसाठी फिडे पंच अमरीश जोशी, फिडे पंच मंगेश गंभीरे, राष्ट्रीय पंच यशवंत बापट, अंकुश रक्ताले, विकास भावे, आदित्य निचत, सुमित ठाकरे काम पाहत आहेत.तिसºया फेरीअखेर, महिला गटात अपेक्षेप्रमाणे मुंबई विद्यापीठाने सहजरीत्या विजय संपादन केला, तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने राजस्थान विद्यापीठावर तर शिवाजी विद्यापीठाने (कोल्हापूर), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर मात करीत आघाडी घेतली.पुरुष गटात पुणे विद्यापीठाने तुल्यबळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३.५- ०.५ तर मुंबईने जबलपूर विद्यापीठाचा ३-१ ने पराभव केला. राजस्थानने अमरावती विद्यापीठाला आश्चर्यकारकरीत्या बरोबरीत रोखले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाChessबुद्धीबळ