शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आंतरधर्मीय विवाहाचा प्रयत्न फसला

By admin | Updated: August 5, 2016 01:34 IST

विवाहाच्या मुद्यावरून दोन विधिज्ञांमध्ये वाद.

अकोला: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगरात राहणार्‍या एका प्रेमी युगुलाचा आंतरधर्मीय विवाह करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी फसला. या विषयावरून न्यायालयातील दोन विधिज्ञांमध्ये वाद झाला. उत्तर प्रदेशातील राहणार्‍या प्रेमी युगुलाने काही दिवसांपूर्वी मुंबई येथे आंतरधर्मीय विवाह केला. विवाह केल्याबद्दल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोघेही गुरुवारी दुपारी न्यायालयात आले. कायदेशीर प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू असतानाच दोन विधिज्ञांमध्ये वाद सुरू झाला. दोघांमधील वाद रामदासपेठ पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी प्रेमी युगुलाला ताब्यात घेतले. युवक व युवती उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगरात राहतात. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याने, दोघांनी मुंबई येथे लग्न केले. वर्षभरापासून युवक अकोल्यात राहत असल्याने तो युवतीला अकोल्यात घेऊन आला. विवाह केल्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोघे गुरुवारी न्यायालयात आले. आंतरधर्मीय विवाहाचे प्रकरण असल्याने न्यायालयातच दोन विधिज्ञांमध्ये वाद झाला. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी युवक व युवतीला ताब्यात घेऊन सिद्धार्थ नगर पोलिसांनी कळविले. यावेळी सिद्धार्थ नगर पोलीस ठाण्यात युवकावर गुन्हा दाखल असल्याची बाब समोर आली. रामदासपेठ पोलिसांच्या माहितीनुसार प्रेमी युगुलाचा विवाह झालेला नसल्यामुळे युवक व युवतीला उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.