शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदल्यांमध्ये घोळ; शिक्षकांवर कारवाई, अधिकारी मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 14:32 IST

अकोला : जिल्हा परिषदेत तब्बल १८५ शिक्षक अतिरिक्त असताना इतर जिल्हा परिषदेतून येणाºया १३ शिक्षकांना सामावून घेण्याचा नियमबाह्य प्रकार चौकशीत उघड झाला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्या कार्यकाळात आंतरजिल्हा बदल्यांमध्ये कमालीचे घोळ झाले.दरम्यान, बिंदूनामावली अंतिम करताना आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांवर कारवाई झाली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांवर कारवाईसाठी चार वर्षांपासून टाळाटाळ सुरू.

अकोला : जिल्हा परिषदेत तब्बल १८५ शिक्षक अतिरिक्त असताना इतर जिल्हा परिषदेतून येणाºया १३ शिक्षकांना सामावून घेण्याचा नियमबाह्य प्रकार चौकशीत उघड झाला. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार असताना वाशिम येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले डॉ. सुभाष पवार, शिक्षणाधिकाºयांवर अनियमिततेची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी जुलै २०१३ मध्येच दिला, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांच्या कार्यकाळात आंतरजिल्हा बदल्यांमध्ये कमालीचे घोळ झाले. त्याचवेळी त्यांच्या रजेदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभार वाशिम जिल्हा परिषदेत कार्यरत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांच्याकडे देण्यात आला. प्रभाराच्या शेवटच्या दिवशी डॉ. पवार यांनी तब्बल १३ शिक्षकांना अकोला जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने सामावून घेतले. हा प्रकार त्यावेळी जिल्हा परिषद सदस्यांनी केलेल्या तक्रारीतून पुढे आला, तर माजी उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे धाव घेत बदली आदेश रद्द करून अधिकाºयांवर कारवाईसाठी याचिका दाखल केली. आयुक्तांपुढे झालेल्या सुनावणीत प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांनी कमालीची अनियमितता केल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी नोंदवलेल्या निरीक्षणात डॉ. पवार यांच्या आदेशातील अनेक अनियमिततेवर बोट ठेवले.

बदली प्रक्रियेतील घोळाचे मुद्दे- जिल्हा परिषदेत १८५ शिक्षक अतिरिक्त असताना १३ शिक्षकांना नियमबाह्यपणे सामावून घेणे. शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास त्यासाठी शिक्षणाधिकाºयांना जबाबदार धरण्याचे नमूद करणे.

- रिक्त जागा नव्हत्या, तरी मोघम संमती देणे.जिल्हा परिषद कार्यालय स्तरावर सहायक शिक्षकाचे एकही पद मंजूर नाही. तरीही १३ शिक्षकांना जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात हजेरीपट ठेवून रुजू करून घेतले. ही बाब पूर्णत: चुकीची, बेकायदेशीर, मनमानीपणाची आहे.कोणत्याही प्रवर्गात रिक्त जागा नसताना शासन नियमांना डावलून शिक्षकांना सामावून घेण्यात आले, ते बेकायदेशीर आहे. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पवार यांचा आदेश बेजबाबदारपणाचा, बेकायदेशीर असल्याने ते कारवाईस पात्र आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेशही विभागीय आयुक्तांनी जुलै २०१३ मध्येच दिला. त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही.

- अधिकाºयांवर कारवाईसाठी टाळाटाळदरम्यान, बिंदूनामावली अंतिम करताना आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांवर कारवाई झाली. त्याचवेळी मुद्दामपणे शासन निर्णयाचे उल्लंघन करणारे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकाºयांवर कारवाईसाठी चार वर्षांपासून टाळाटाळ सुरू असल्याचे यानिमित्ताने पुढे येत आहे.

या शिक्षकांना दिली नियमाबाह्य पदस्थापनारघुनाथ पांडे, चंदा पवार, रुपेश राठोड, प्रदीप जाधव, राजेंद्र दिवनाले, प्रतिभा बचे, सीमा सरोदे, प्रशांत सरोदे, नजमुस्साहेर अफगाणी, रेणुका बाबर, ज्योती गाडगे, सुरेखा बिजवे, धर्मेंद्र चव्हाण.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद