शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

शिक्षकांच्या समस्यांसाठी एकवटल्या संघटना

By admin | Updated: March 21, 2017 02:48 IST

संघटनांच्या समन्वय समितीने सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांची भेट घेतली.

अकोला, दि. २0- जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करा, या मागणीसाठी सर्वच संघटनांच्या समन्वय समितीने सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांची भेट घेतली. या समस्या सोडवण्यासाठी आता सर्वच संघटना एकजुटीने पुढे येणार असल्याचे पदाधिकार्‍यांनी सांगितले. सातत्याने मागणी करूनही शिक्षकांच्या समस्या निकाली निघालेल्या नाहीत. त्यासाठी सर्व संघटनांनी एकत्रित येत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणी सात दिवसात लागू करा, २४ वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना प्रशिक्षण देऊन निवड श्रेणी मंजूर करणे, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळेत वर्ग ५ वा आणि ८ वा चालू वर्षापासून सुरू करा, दरमहा पगार एक तारखेला देण्यात यावे, वैद्यकीय देयक अदा करण्याची मुदत निश्‍चित करणे, प्रलंबित देयके तत्काळ अदा करणे, शिक्षकांचे सीपीएफ खाते नंबर देऊन अद्ययावत करणे, शिक्षणसेवकांना शिक्षक म्हणून आदेश देणे, शालेय पोषण आहार मानधन व खर्च दरमहा नियमितपणे देणे, खोली बांधकामाचे पाच टक्के रक्कम अदा करणे, जिल्हा परिषद आगरकर विद्यालय बंद न करता ताजनापेठ उर्दू शाळेस हस्तांतरित करावे, भाषा विषयात सुटची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, या मागण्या आहेत. त्यावर महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक संघटनेचे शशिकांत गायकवाड, बहुजन शिक्षक महासंघाचे महेंद्र भगत, शिक्षकसेनेचे संजय घोडे, देवानंद मोरे, प्राथमिक शिक्षकसंघाचे रजनिश ढाकरे, उर्दू अल्पसंख्याक संघटनेचे जावेद अतहर खान, उर्दू शिक्षक संघटनेचे जव्वाद हुसैन, अपंग कर्मचारी संघटनेचे रवींद्र देशमुख, अँक्शन फोर्स असोसिएशनचे शंकर डाबेराव, शिक्षक समितीचे नामदेव फाले, अपंग माध्यमिक संघटनेचे जावेद इकबाल उपस्थित होते.डिजिटल शाळांचे रोटरी क्लबकडून गाजर!रोटरी क्लबने शाळा डिजिटल करण्यासाठी शाळांकडून निधी घेतला. मात्र, वर्षभरापासून काहीच केले नाही. त्यामुळे यावरही उपाययोजना करा. बिंदू नामावली घोळाचा मागितला खुलासाविशेष मागास प्रवर्गातील शिक्षक नियमबाह्यरीत्या अतिरिक्त दाखवले जात आहेत. त्यांच्याबाबत २00७ च्या मंजूर बिंदू नामावलीनुसार कारवाई करा. तसेच कारवाईसंदर्भात ह्यलोकमतह्णमध्ये प्रसिद्ध वृत्ताचा खुलासाही प्रशासनाला मागण्यात आला.