शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

तीन लाख शेतकऱ्यांना देणार विम्याचे ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 15:49 IST

अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात १८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यात येणार आहे.विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येणार आहे.

अकोला : मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार शेतकºयांना विम्याचे कवच देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत पात्र गरीब,गरजू व वंचित लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो. वार्षिक १२ रुपये हप्ता (प्रीमियम )असलेल्या मिशन पंतप्रधान सुरक्षा विमा योजना अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात सन २०१८-१९ या वर्षात अकोला जिल्ह्यातील ३ लाख १६ खातेदार शेतकºयांना विमा योजनेत सहभागी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात १८ ते ३१ मे या कालावधीत जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्यात येणार आहे. विमा काढलेल्या शेतकºयांच्या नावे प्रत्येकी २२० रुपये मुदत ठेव (एफडी) संबंधित बँकेत जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावांत शेतकºयांचे अर्ज भरुन घेण्यात येणार आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांना गाव व बँकनिहाय अर्ज देण्यात येणार असून, संबंधित कर्मचारी विमा काढणाºया शेतकºयांचे अर्ज भरुन घेतील. १८ ते ७० वर्षे वयोगटातील शेतकरी या विमा योजनेत सहभागी होऊ शकतील. जिल्ह्यातील शेतकºयांचा विमा काढण्याच्या या योजनेत शेतकºयांच्या विमा हप्त्याची (प्रीमियम )रक्कम भरण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उपनिबंधक जी.जी.मावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.अतुल दोड, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते उपस्थित होते.आठ कोटींचा निधी खर्च करणार!मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व खातेदार ३ लाख १६ हजार शेतकºयांचा विमा काढण्याच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत आठ कोटींचा निधी खर्च करण्यात येणार, तसेच शेतकºयांचा विमा काढण्याच्या कामात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.विमा काढलेल्या शेतकºयांना असा मिळणार लाभ!मिशन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत विमा काढलेल्या शेतकरी कुटुंबांना अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे अंशत: अपंगत्व आल्यास एक लाख आणि पूर्णत: अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये असा लाभ मिळणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय