शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
2
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
3
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
5
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
6
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
7
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
8
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
9
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
10
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
11
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
12
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
13
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
14
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
15
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
16
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
17
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
18
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
19
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
20
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!

सौर ऊर्जानिर्मितीसाठी कुशल मनुष्यबळाची वानवा - डॉ. महिंद्रन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 18:34 IST

अकोला: देशात नैसर्गिक संसाधने विपुल असून, भविष्यातील विजेची गरज बघता या संसाधनांचा वापर करू न सौर ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे; पण कुशल मनुष्यबळाची वानवा असल्याने भारत सरकारने या क्षेत्रात कौशल्य विकासावर भर दिला असल्याची माहिती तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे डॉ. आर. महिंद्रन, कोईम्बतूर यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.

- राजरत्न सिरसाटअकोला: देशात नैसर्गिक संसाधने विपुल असून, भविष्यातील विजेची गरज बघता या संसाधनांचा वापर करू न सौर ऊर्जा निर्माण करणे गरजेचे आहे; पण कुशल मनुष्यबळाची वानवा असल्याने भारत सरकारने या क्षेत्रात कौशल्य विकासावर भर दिला असल्याची माहिती तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या अपारंपरिक ऊर्जा विभागाचे डॉ. आर. महिंद्रन, कोईम्बतूर यांनी ‘लोकमत’शी बातचीत करताना दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या विषयावरील प्रशिक्षण देण्यासाठी देशातील उच्च शिक्षणाचा प्रकल्प भारतीय कृषी संशोधन परिषदेने दिला आहे. या प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठात अपारंपरिक ऊर्जेचा विकास या विषयावर दहा दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी डॉ. महिंद्रन अकोला येथे आले आहेत.

प्रश्न- आतापर्यंत किती ऊर्जा निर्माण केली?उत्तर- देशात सद्यस्थितीत ३ लाख ४० हजार मेगावॉट विजेची गरज आहे. यामध्ये सौर ऊर्जेचा वाटा २१ टक्के म्हणजे ७० हजार मेगावॉट वीज उत्पादन सौर ऊर्जेतून निर्माण केले जाते.सध्या वाऱ्यापासून तसेच जैव ऊर्जादेखील तयार करण्यात येत आहे. पंजाबमध्ये शेतात शेतमालाचे अवशेष जाळतात. त्यापासून प्रदूषणही होते; पण आता तेथे या अवशेषांपासूनदेखील ऊर्जा निर्माण केली जात आहे.

प्रश्न- सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठीच्या अडचणी काय?उत्तर- भविष्यातील विजेची गरज भागवायची असेल, तर अपारंपरिक, सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. देशात नैसर्गिक संसाधने विपुल प्रमाणात आहेत; पण त्याचा वापर करण्यासाठीचे प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.

प्रश्न- यासाठीच्या उपाययोजना काय?उत्तर- नैसर्गिक संसाधनांचा वापर करू न सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे. म्हणूनच देशात क्षमता बांधणी, कौशल्य विकासावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अकोल्यात या विषयावरील आंतरराष्टÑीय पातळीवरील प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येथे अपारंपरिक ऊर्जा स्रोत विकास या विषयावर तज्ज्ञ प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करीत आहेत.

प्रश्न- देशात सर्वात जास्त सौर ऊर्जेचे उत्पादन कोठे होते?उत्तर- देशात सर्वात जास्त उत्पादन हे तामिळनाडू राज्यात केले जाते. तामिळनाडू राज्यात वाºयापासून ६० टक्के ऊर्जा निर्माण केली जाते. त्यानंतर महाराष्टÑाचा क्रमांक येतो. त्यासाठी मात्र तेथे सोलर सिंचन व्यवस्थेसाठी ९० टक्के अनुदान दिले जाते, तर सोलर शुष्ककसाठी ५० टक्के अनुदान आहे. भारत सरकारने सौर ऊर्जा अर्थात अपारंपरिक ऊर्जा निर्मितीवर प्रचंड भर दिला आहे. त्याच अनुषंगाने अलीकडच्या दोन-चार वर्षात या क्षेत्रात वेगाने काम होत आहे. म्हणूनच प्रशिक्षित मनुष्यबळ विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले. यासाठीची महत्त्वाची प्रशिक्षणाची जबाबदारी भारतीय कृषी संशोधन परिषदेने अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर टाकली. कृषी क्षेत्रात क्रांती घडवायची असेल, तर ही कामे वेगाने करावी लागणार आहेत.

प्रश्न - या कार्यशाळेत किती प्रशिक्षणार्थी आहेत?उत्तर- संपूर्ण देशातून या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना प्रशिक्षण देणारे तज्ज्ञदेखील संपूर्ण देशातील आहेत. सध्या बंगळुरू, गुजरात, राजस्थान तसेच महाराष्टÑातील तज्ज्ञ येथे आले आहेत. ग्रामीण भागातील प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. कारण दुर्गम, अतिदुर्गम भागात विजेचा पुरवठा करायचा आहे. अर्थात, देशातील प्रत्येक भागात सौर ऊर्जा पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखतscienceविज्ञान