शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

सीसी कॅमेरे बसविण्यासाठी अकोल्यातील दोन्ही आगारांचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 15:02 IST

अकोला : महाराष्ट्रातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासाठी संबंधित कंपनीने आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे.

ठळक मुद्दे नवीन वर्षाच्या प्रारंभाआधी अकोल्यासह राज्यातील सर्व आगारांवर सीसी कॅमेरे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्धा किलोमीटर अंतरापर्यंतचे चित्र टिपल्या जाऊ शकेल, एवढी क्षमता या कॅमेºयांमध्ये असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाºयांनी केला आहे. कंपनीसोबत पाच वर्षांचा कंत्राट राज्य शासनाने केला असून, त्याची आॅपरेटिंग सिस्टिमची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.

अकोला : महाराष्ट्रातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर सीसी कॅमेरे बसविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासाठी संबंधित कंपनीने आता प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे. अकोला आगार क्रमांक एक आणि दोनवरील क्षेत्रफळ आणि कॅमेरे लावण्याच्या ठिकाणाचे सर्वेक्षण केले. नवीन वर्षाच्या प्रारंभाआधी अकोल्यासह राज्यातील सर्व आगारांवर सीसी कॅमेरे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.प्रवासी आणि त्यांच्या साहित्याची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला असून, या प्रणालीवर राज्यात ३६ कोटींचा खर्च होत आहे. मे. आॅरीसन प्रो. सोल्युशन्स लि. कंपनी मुंबईच्या अधिकाºयांनी अकोलाच्या दोन्ही आगाराचा दौरा करून वरिष्ठांकडे अहवाल पाठविला आहे. त्यामुळे लवकरच अकोलाच्या दोन्ही आगारावर कायम सुरक्षेची नजर राहणार आहे. अर्धा किलोमीटर अंतरापर्यंतचे चित्र टिपल्या जाऊ शकेल, एवढी क्षमता या कॅमेºयांमध्ये असल्याचा दावा कंपनीच्या अधिकाºयांनी केला आहे. मुंबईपासून घेऊन तर राज्यातील आणि जिल्हा, तालुका पातळीवरील सर्व आगारांवर सीसी कॅमेरे लावण्याच्या या निर्णयामुळे अनेक प्रकारावर आळा बसणार आहे. कॅमेरा, केबल्स, एलईडी स्क्रीन आदी कोणत्या ठिकाणी असेल, डाटा स्टोअर रूम कोठे असावी, यासंदर्भात सर्व माहिती टिपून हे अधिकारी अकोल्यातून गेले. कंपनीसोबत पाच वर्षांचा कंत्राट राज्य शासनाने केला असून, त्याची आॅपरेटिंग सिस्टिमची जबाबदारीही कंपनीने स्वीकारली आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Bus Standअकोला बस स्थानक