शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी: दहा वर्षीय बालकाने केले दोन हजार बीज संकलन व रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:17 IST

दहा वर्षीय बालकाने उन्हाळ्याच्या सुटीत वृक्षारोपण व संगोपनासाठी विविध जातीच्या वृक्षांच्या २ हजार बिया संकलन करून त्या पाऊस येताच रस्त्याच्या दुतर्फा व खुल्या जागेत रोपण करण्याचा संकल्प केला आहे.

- सत्यशील सावरकर

तेल्हारा: अमाप वृक्षतोड आहे. भूजल पातळी खोल जात आहे. जमिनीची प्रचंड धूप होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत आहे. हा समतोल साधायचा असेल तर वृक्षारोपण, जल बचतीचे कार्य करणे गरजेचे आहे. या जाणिवेतूनच दहा वर्षीय बालकाने उन्हाळ्याच्या सुटीत वृक्षारोपण व संगोपनासाठी विविध जातीच्या वृक्षांच्या २ हजार बिया संकलन करून त्या पाऊस येताच रस्त्याच्या दुतर्फा व खुल्या जागेत रोपण करण्याचा संकल्प केला आहे. बीज संकलनाचा कार्य तो दोन वर्षांपासून करीत असून, त्याने वृक्षारोपण केलेली काही झाडे डौलदार झाली आहे.शासनाच्यावतीने वृक्षारोपण व संवर्धनासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना, शासकीय निमशासकीय कार्यालय यांना वृक्षारोपण करण्याचे उद्दिष्ट दिले. ३३ कोटी वृक्षारोपण लागवडीचे लक्ष्य शासनाने निश्चित केले होते. यातून प्रेरित होत, तेल्हारा येथील संत सावता प्रबोधन कॉलनी येथील मंदार सचिन ठोंबरे (१0) या बालकाने वृक्ष बिया संकलन करून रोपण व संवर्धनासाठीचे कार्य सुरू केले आहे. बालपणापासूनच त्याला निसर्गाची आवड आहे. घराच्या परसबागेतील झाडांची नीगा राखण्याचे काम मंदार करतो. गत दोन वर्षांपासून उन्हाळ्यात सुटी लागताच तो स्वत: झाडांच्या बिया संकलित करतो. तसेच वर्षभरसुद्धा मिळालेल्या वेळातसुद्धा बिया संकलनाचे काम करतो. सध्या त्याच्याकडे २ हजार बिया गोळा झाल्या आहेत. मंदारच्या या उपक्रमामध्ये आई, वडील, बहीण व शेजारच्या मित्रसुद्धा मदत करतात. पावसाला सुरुवात झाल्यावर मंदार शहरात ठिकठिकाणी फिरून रस्त्याच्या दोन्ही बाजूला व खुल्या जागेत संकलित केलेल्या बियांचे रोपण करतो. त्याच्या या उपक्रमात प्रबोधन व संत सावता कॉलनीमधील नागरिक हिरिरीने सहभागी होतात. मंदार वृक्षारोपण केलेले परिसरातील अनेक वृक्ष डोलताना दिसतात. मंदारसारख्या लहान मुलाने बीज संकलनाचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा