शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रेरणादायी :   बाळापूर पं. स. उपसभापतीची उच्चशिक्षित पत्नी देतेय विद्यार्थ्यांना धडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 14:57 IST

गत काही दिवसांपासून पं. स. उपसभापतीच्या पत्नी विद्यार्थ्यांना गणित, मराठी विषयांसोबत इतर विषयांचे धडे देत आहेत.

नितीन गव्हाळे, अकोला: जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. ही बाब बाळापूर पंचायत समितीचे उपसभापती धनंजय दांदळे यांना शाळा भेटीदरम्यान लक्षात आली. त्यांनी शाळेला शिक्षक मिळावा, यासाठी प्रयत्न केले; परंतु शिक्षक मिळाला नाही. शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या दृष्टिकोनातून त्यांनीच पुढाकार घेत, उच्चशिक्षित असलेल्या त्यांच्या पत्नीला शाळेवर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पाठविले. गत काही दिवसांपासून पं. स. उपसभापतीच्या पत्नी विद्यार्थ्यांना गणित, मराठी विषयांसोबत इतर विषयांचे धडे देत आहेत.बाळापूर तालुक्यातील दधम हे पूर्णत: आदिवासी गाव. येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्याही उत्तम; परंतु शिक्षकाचे एक पद या ठिकाणी रिक्त असल्याने, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. नवनियुक्त पंचायत समिती उपसभापती धनंजय दांदळे यांनी शाळेला भेट दिल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी रिक्त पदावर शिक्षक मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा केला; परंतु तांत्रिक अडचणींमुळे प्रशासनाला दधम शाळेवर शिक्षक देणे शक्य झाले नाही. विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहून, उपसभापती दांदळे यांनी त्यांच्या उच्चशिक्षित, टीईटी परीक्षा उत्तीर्ण पत्नी मोहिनी दांदळे यांना ही बाब सांगितली. त्यांनीही लगेच त्या शाळेवर पाहुणा शिक्षक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. मोहिनी दांदळे या दररोज खिरपुरी येथून दधम जि.प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यायला जातात. विद्यार्थ्यांना गणित, मराठी, इंग्रजी, सामाजिक शास्त्रसारखे विषय शिकवितात. एका लोकप्रतिनिधी आणि त्याच्या पत्नीने विद्यार्थ्यांसाठी केलेला हा विचार प्रेरणादायी तर आहेच, शिवाय आदर्श घेण्यासारखा आहे. शिक्षकांअभावी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षक उपलब्ध होत नाही. अशावेळी अनेकदा आजूबाजूला उच्चशिक्षित युवक, लोकप्रतिनिधींचे घरातील मुले, मुली, सुना उच्चशिक्षित असलेल्या दिसून येतात; परंतु या विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून कोणी पुढाकार घेत नाही. या दांदळे दाम्पत्यापासून आदर्श घेतला तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही. गरोदर असूनही जातात शिकवायला!पं.स. उपसभापती धनंजय दांदळे यांच्या पत्नी मोहिनी दांदळे गरोदर असून, दररोज शाळेत विद्यार्थ्यांना शिकवायला जातात. प्रकृतीची चिंता न करता, केवळ विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने शाळेत शिक्षण देत आहेत. मोहिनी दांदळे यांचे एमए, डीएड आणि एमबीएपर्यंत शिक्षण झाले आहे. एवढेच नाही तर त्या दोन्ही सीईटी, टीईटी परीक्षा उत्तीर्ण आहेत. येत्या शिक्षक भरतीमध्ये त्यांची शिक्षक म्हणून निवड होणार आहे.

 

टॅग्स :BalapurबाळापूरAkolaअकोलाEducation Sectorशिक्षण क्षेत्र