शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विशेष शिबिरात ९७ संशयीत क्षयरुग्ण बालकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 14:50 IST

अकोला : क्षयरोग मुक्त अकोला जिल्हा - २०२० अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या क्षयरुग्ण तपासणी मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांपैकी ९७ बालकांची तपासणी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रविवारी पार पडलेल्या विशेष शिबिरात करण्यात आली.

ठळक मुद्दे३ एप्रिलपर्यंत तपासणी झालेल्या ३३,९६३ बालकांपैकी १३७ बालकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून आली होती. शिबिरात एकून ९७ बालकांची तपासणी सीबी नॅट मशिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. २७ बालकांना छातीचा एक्स-रे, तर ३ बालकांना सीटी स्कॅन करण्याचे सुचविण्यात आले.

अकोला : क्षयरोग मुक्त अकोला जिल्हा - २०२० अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या क्षयरुग्ण तपासणी मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांपैकी ९७ बालकांची तपासणी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात रविवारी पार पडलेल्या विशेष शिबिरात करण्यात आली.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनात क्षयरोग तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गतच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत २ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत १३ एप्रिलपर्यंत तपासणी झालेल्या ३३,९६३ बालकांपैकी १३७ बालकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून आली होती. या बालकांच्या तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम तर्फे विशेष तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात एकून ९७ बालकांची तपासणी सीबी नॅट मशिनद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यापैकी ८ बालकांना मॉन्टेक्स तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर २७ बालकांना छातीचा एक्स-रे, तर ३ बालकांना सीटी स्कॅन करण्याचे सुचविण्यात आले. उर्वरित ५५ बालकांना रक्त व थुंकी तपासणी करण्याचे सांगण्यात आले. या बालकांना सुचविण्यात आलेल्या तपासण्या राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत करण्यात आल्या असून, अद्याप अहवाल येणे बाकी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिनेश नेताम, क्षयरोग विभागाच्या डॉ. मेधा गोळे, ‘राबास्वाका’ जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय