शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तीन कोटी रुपयांची कीटकनाशके, खते जप्तीची कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:05 IST

अकोला: परवाना नसताना कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्या, आस्थापनावर कारवाई करू न तीन कोटी रुपये किमतीच्या निविष्ठा जप्त करण्यात आल्या.

अकोला: परवाना नसताना कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्या, आस्थापनावर कारवाई करू न तीन कोटी रुपये किमतीच्या निविष्ठा जप्त करण्यात आल्या. अकोल्यात तीन दिवस अगोदर दोन कोटी रुपये किमतीची विनापरवाना मिश्र खते जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला; पण मागील वर्षी लाखो रुपयांच्या निविष्ठा जप्त करण्यात आल्या. त्यावर पुढे काय ठोस कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कृषी विभागाने राज्यात भेसळयुक्त व अप्रमाणित निविष्ठा निर्मिती करणाऱ्या कंपन्या व साठा असलेल्या गोदामावर धाडसत्र सुरू केले असून, मागील आठवड्यापासून सुरू करण्यात आलेल्या धाडीत तीन कोटी रुपये किमतीची कीटकनाशके, मिश्र खते, निविष्ठा जप्त करण्यात आल्या. गुन्हेही दाखल करण्यात आले. अकोल्यात मार्च महिन्यात २ कोटी १७ लाख रुपयांचे अप्रमाणित, नोंदणी नसलेली मिश्र व विद्राव्य खतांचा साठा आढळून आला. मे. सेवीयो बायो आॅर्गेनिक अ‍ॅण्ड फर्टिलायझर प्रा.लि. झुंझवाड, नंदागड ता. खानापूर जि. बेळगाव (कर्नाटक) कंपनीचा हा साठा आहे. साठा आढळल्यानंतर कंपनी संचालकाना कागदपत्रे सादर करण्यासाठी सात दिवसांची वेळ देण्यात आली. तथापि, या सात दिवसांत कंपनीने कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे अकोला कृषी गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे यांनी १ एप्रिल रोजी अकोल्यात पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरू न पोलिसांनी कंपनीच्या औरंगाबाद येथील सूर्यकांत मुंडे विपणन व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर कृषी विभागाने राज्यात तसेच विदर्भात अप्रमाणित, बोगस, कृषी निविष्ठा विक्री व साठा करणाºयाविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, मागील आठवड्यापासून धाडसत्र सुरू केले. अकोल्यात गुण नियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे व मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी ही कारवाई केली. राज्यात कोल्हापूर, नांदेड व लाूतर येथेही अशा पद्धतीचा साठा आढळून आला आहे. पश्चिम विदर्भात मोठ्या प्रमाणात अप्रमाणिक कृषी निविष्ठांचा साठा केला जातो. अकोला हे मुख्य केंद्र असून, दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणात असा साठा जप्त करण्यात येतो. तथापि, ठोस निष्कर्ष अद्याप तरी निघाले नसल्याचे चित्र आहे.- अद्ययावत अभिलेख आढळले नसल्याने मे. सेवीयो बायोचे २ कोटी १७ लाख रुपयांची मिश्र खते जप्त करण्यात आली तसेच पोलिसांत तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्यात आला.नितीन लोखंडे,गुणनियंत्रण अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र