शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

बहूद्देशीय संस्था बळकावल्याप्रकरणी चौकशीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 02:26 IST

अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था बळकावल्याप्रकरणी  पोलीस चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी संस्थापक  संचालकांचे बयान नोंदविले असून, यामध्ये मोठा घोळ असल्याचे त्यांनी बयानात  नमूद केले आहे.

ठळक मुद्देसंस्थापक संस्थाचालकांचे बयान नोंदविले प्रभाव लोकमतचा

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोल्यातील सहायक धर्मादाय आयुक्तांकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर  प्रतिष्ठान नावाने १९९0 मध्ये नोंदणीकृत असलेल्या संस्था बळकावल्याप्रकरणी  पोलीस चौकशीस प्रारंभ करण्यात आला आहे. खदान पोलिसांनी संस्थापक  संचालकांचे बयान नोंदविले असून, यामध्ये मोठा घोळ असल्याचे त्यांनी बयानात  नमूद केले आहे.आदर्श कॉलनीतील रहिवासी दामोदर कोंडाजी इंगळे यांनी त्यांच्या १५  सहकार्‍यांसह १९९0 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान रजिस्टर्ड क्रमांक  २२५६/एकेएल ही संस्था अकोल्यात सहायक धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत  केली होती; मात्र त्यानंतर ही संस्था सोलापूर, सांगली व मुंबई येथील रहिवासी  असलेल्या १५ जणांनी अकोल्यातील सभासदांच्या बनावट स्वाक्षरी करून परस्पर  ‘चेंज रिपोर्ट’ अकोला धर्मादाय आयुक्तांकडे सादर करून बळकावली. सदर संस्थेचे  सोलापूर येथे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सहायक धर्मादाय  आयुक्तांनी या संस्थेच्या गांधी नगर व्हीएचबी कॉलनी येथील कार्यालयात नोटीस  पाठविल्यानंतर हा प्रकार उघड झाला. संस्था बळकावल्याचे निदर्शनास येताच संस् थापक सभासदांना धक्का बसल्यानंतर त्यांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  पोलिसांनी या किचकट प्रकरणी चौकशीस प्रांरभ केला असून, संस्थापक  संचालकांचे बयान नोंदविले आहेत.

मृत्यू प्रमाणपत्र पोलिसांकडे सादर२00१ मध्येच मृत्यू झालेले कैलास सरकाटे यांचे महापालिकेतून मृत्यू प्रमाणपत्र  काढण्यात आले असून, ते पोलिसांकडे सादर करण्यात आले आहे. यावरून  कैलास सरकाटे यांची स्वाक्षरी करणार्‍याचे पितळ लवकरच उघडे पडणार  असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अमरावती येथे अहवाल सादरसाहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडूनही या प्रकरणाची चौकशी करण्यात  आली असून, या चौकशीचा अहवाल अमरावती येथील सह धर्मादाय आयुक्त  कार्यालयाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आहे. सहायक धर्मादाय आयुक्त  कार्यालयाचा अहवाल गोपनीय असल्याची माहिती आहे.

सरकाटे यांना श्रद्धांजली कैलास सरकाटे यांचे २00१ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात  आली होती. ज्या तीन लोकांनी २00१ मध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली त्याच तीन  लोकांच्या नावाने ऑडिट रिपोर्ट, चेंज रिपोर्टमध्ये कैलास सरकाटे यांचे नाव  टाकण्यात आले आहे. सदर तीन लोकांना सरकाटे यांचे निधन झाल्याचे माहिती  असतानाही त्यांचेच नाव वापरून स्वाक्षरी केल्याचे असल्याचे स्पष्ट होत आहे.