शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

५२ खासगी कंपन्यांच्या बियाणे विक्रीची चौकशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 10:14 IST

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची विक्री करताना, खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून नियमांचे पालन करण्यात आले की नाही, यासंदर्भात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी कंपन्यांच्या सोयाबीन बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली असून, बियाणे विक्रीसंदर्भात परवान्यांची माहिती दोन दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी (एसएओ) शुक्रवारी संबंधित खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांना दिले.जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या सुरू असून, पेरणीनंतर सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कृषी विभागाकडे करण्यात येत आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यात विविध खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून सोयाबीन बियाण्यांची विक्री करताना नियमांचे पालन करण्यात आले की नाही, यासंदर्भात पडताळणी करण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात बियाणे विक्रीसंदर्भात घेतलेल्या परवान्यांची माहिती दोन दिवसात सादर करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी संबंधित खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांना दिले.

कंपन्यांकडून अशी मागितली माहिती!सोयाबीन बियाणे विक्रीचा परवाना आहे का, बियाणे कोठे तयार करण्यात आले, बियाणे चाचणी अहवाल काय आहे, जिल्ह्यात कोणत्या वितरकास बियाणे वितरित केले, जिल्ह्यात बियाणे विक्रीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांची परवानगी घेतली आहे काय, बियाणे विक्रीसंदर्भात दैनंदिन अहवाल सादर केला आहे काय, इत्यादी प्रकारची माहिती ५२ खासगी सोयाबीन बियाणे कंपन्यांकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी मागितली आहे.

सोयाबीन उगवले नसल्याच्या ९८९ तक्रारी!सोयाबीन बियाणे उगवले नसल्यासंदर्भात ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात ९८९ शेतकºयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ४९६ शेतकºयांच्या तक्रारी ‘महाबीज’च्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात असून, उर्वरित तक्रारी विविध खासगी सोयाबीन कंपन्यांच्या बियाण्यासंदर्भात आहेत. एकूण प्राप्त तक्रारींपैकी ४३० शेतकºयांच्या तक्रारीसंदर्भात सोयाबीन उगवले नसलेल्या शेतांमध्ये पंचनामे करण्यात आले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी सांगितले.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ५२ खासगी सोयाबीन कंपन्यांकडून जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या सोयाबीन बियाणे विक्रीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोयाबीन विक्रीसंदर्भात गुन्ह्याचे स्वरूप पाहून संबंधित बियाणे कंपन्यांविरुद्ध पुढील कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.- मोहन वाघजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र