शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दुधाळ जनावरांच्या योजनांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 05:42 IST

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवल्या जाणाºया दुधाळ जनावरे वाटप तसेच पशुसंवर्धन विषयक सर्व योजनांचा आढावा घेत अहवाल सादर करण्यासाठी पशुसंवर्धन उप सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे.

- सदानंद सिरसाट अकोला : शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवल्या जाणाºया दुधाळ जनावरे वाटप तसेच पशुसंवर्धन विषयक सर्व योजनांचा आढावा घेत अहवाल सादर करण्यासाठी पशुसंवर्धन उप सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. समिती राज्यात कोठेही अचानक भेट देऊन जनावरांची पडताळणी करणार आहे. पंचायत राज समितीने अकोला जिल्हा परिषदेत भेट दिल्यानंतर २९ मे रोजी झालेल्या सचिवांच्या साक्षीमध्ये योजनांची चौकशी करण्याचे ठरले, हे विशेष. विधिमंडळाच्या पंचायत राज समितीने जून २०१७ मध्ये अकोला जिल्हा परिषदेत पडताळणी भेट दिली. त्यामध्ये आढळून आलेल्या विविध अनियमितता, अपहाराच्या प्रकरणात जिल्हा परिषदेने कोणती कारवाई केली, याबाबत संबंधित विभागांच्या सचिवांची साक्ष २९ मे २०१८ रोजी विधिमंडळात घेण्यात आली. त्यामध्ये पशुसंवर्धन विभागाच्या सचिवांच्या साक्षीमध्ये शेतकºयांसाठीच्या योजनांमध्ये गोंधळ असल्याची बाब समोर आली. कृषी, पशुसंवर्धन विभागाकडून राबवल्या जाणाºया दुधाळ जनावरे वाटप, चारा वाटप, संकरित पशू पैदास, शेळी- मेंढी वाटपाच्या योजनांची अंमलबजावणी कशी केली जाते. त्याची फलश्रुती किती आहे, याचे मूल्यमापन करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासाठी समिती गठित करण्याचे निर्देशही समितीचे अध्यक्ष आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांना दिले.समितीमध्ये चार अधिकारीपंचायत राज समितीने दिलेल्या निर्देशानुसार चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून पशुसंवर्धन विभागाचे उप सचिव राहतील. सदस्य अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त, संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, सदस्य सचिव म्हणून संबंधित जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अचानक भेटीत जनावरांची चौकशीसमितीचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्य आहे. पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींच्या घरी अचानक भेट देऊन जनावरांची पडताळणी करणे, तालुका स्तरावर योजनांचा पाठपुरावा अहवाल तपासणी करणे, पशुवैद्यकीय दवाखाना स्तरावर योजनांचा पाठपुरावा नोंदवही तपासणे, पशुपालक, पशुवैद्यकांना योजना अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करणे, योजना अंमलबजावणीचा फलश्रुती अहवाल शासनाला सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे.