शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी निविष्ठा पुरवठ्यासाठी सहकार विभागाचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 17:42 IST

कृषी निविष्ठा विक्रीची सेवा देण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २५ सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

अकोला : शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून कृषी निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचा उपक्रम कृषी विभागाने सुरू केला आहे. याच धर्तीवर सहकार विभागाने ही कृषी निविष्ठा विक्रीची सेवा देण्यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २५ सेवा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने देशात ताळेबंदी घोषित केली आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी सर्वत्र उपाययोजना केल्या जात आहेत. आता खरीप हंगाम तोंडावर आल्याने खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदीसाठी शेतकरी सेवा केंद्रावर येणार आहेत; परंतु गर्दी टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकरी बचत गटामार्फत बी-बियाणे, खते, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने सहकार विभागानेदेखील राज्यात प्रत्येक जिल्ह्यात २५ शेती सेवा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा उपनिबंधक, सहायक निबंधक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच नाबार्डच्या सहकार्याने शेती सेवा केंद्रे चालू केली जाणार आहेत. यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकरी सोसायटी उत्पादक कंपन्या बैठक घेण्याचे ठरले आहे.दरवर्षी शेतकरी त्यांना लागणारी बी-बियाणे, खते, शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री, अवजारे प्रामुख्याने व्यापाºयांकडून खरेदी करतात. बºयाच वेळा शेतकºयांची फसवणूक करण्याचे प्रकार घडतात. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत सेवा सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्यामार्फत ग्रामीण भागात खते, कीटकनाशके, बियाणे विक्रीची सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी यातील सर्व जिल्हा उपनिबंधकांना जिल्ह्यातील सक्षम आर्थिक तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या पालकांसोबत बैठक घेण्याचे सूचित करण्यात आले आहे.राज्यात जवळपास २१ हजारावर प्राथमिक पतपुरवठा संस्था सक्षम शासनामार्फत बी-बियाणे, कीटकनाशके, यंत्रसामग्री सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जिल्ह्यात केंद्रे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे यांनी दिली.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती