शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अप्रशिक्षित शिक्षकांची माहिती तीन दिवसात मागवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:30 IST

अकोला: जिल्हा परिषदेमध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची माहिती शासनास विनाविलंब सादर करण्याचे बजावल्यानंतर अद्यापही ती सादर न झाल्याने ती माहिती आता १० डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी ५ डिसेंबर रोजी दिले आहेत.

अकोला: जिल्हा परिषदेमध्ये अप्रशिक्षित शिक्षक म्हणून नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची माहिती शासनास विनाविलंब सादर करण्याचे बजावल्यानंतर अद्यापही ती सादर न झाल्याने ती माहिती आता १० डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिवांनी ५ डिसेंबर रोजी दिले आहेत. ही माहिती तातडीने सादर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष देवानंद मोरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली होती.शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव यांनी १ नोव्हेंबर रोजीच राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना जिल्हा परिषदेंतर्गत अप्रशिक्षित शिक्षक पदावर नियुक्ती झालेल्यांची माहिती मागविली आहे. त्यामध्ये त्या शिक्षकांनी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला कालावधी, मूळ नियुक्ती दिनांक, तीन वर्षे सेवा पूर्ण झाल्याचा दिनांक, डी.एड. प्रशिक्षित झाल्याचा दिनांक व इतर माहिती विहित नमुन्यात मागविण्यात आली. त्यानुसार शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ही माहिती १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले; मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ती माहिती शासनास सादर केली नाही. त्यामुळे शासनाने पुन्हा पत्र देत १० डिसेंबरपर्यंत सादर करण्याची दक्षता घेण्याचे बजावले. अकोला जिल्हा परिषदेत कार्यरत शेकडो अप्रशिक्षित शिक्षक वरिष्ठ वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागाने विनाविलंब शासनाला माहिती सादर करावी, अन्यथा शिक्षकांच्या होणाºया नुकसानाला शिक्षण विभाग जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देवानंद मोरे यांनी निवेदनात दिला होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक