शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मिळणार माहिती तंत्रज्ञान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 16:24 IST

शेती विकास व रोजगार निर्मितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला (आयटी) माहिती तंत्रज्ञान केंद्र मिळणार आहे.

- राजरत्न सिरसाट

अकोला : शेती विकास व रोजगार निर्मितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला (आयटी) माहिती तंत्रज्ञान केंद्र मिळणार आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने त्यासाठीची हिरवी झेंडी दाखविली आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभियंत्यांनी कृषी विद्यापीठाला भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. कृषी विद्यापीठाच्यावतीने यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे.माहिती तंत्रज्ञानाचा शेतीला फायदा करू न घेण्यासाठी केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी यासाठीचा पाठपुरावा केला आहे. विद्यापीठाचे कृषी शास्त्रज्ञ संशोधन करीतच आहेत. त्यांना आयटीची जोड दिल्यास या माध्यमातून शेती यंत्र व तंत्रज्ञान विकसित करता येतील, त्याचा शेती विकासाला उपयोग होणार आहे. विशेष करू न गावात रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने विद्यार्थ्यांनी गावातच उद्योग उभारावेत, असाही उद्देश आहे. पीक नुकसानाची माहिती यामुळे लवकर मिळण्यास मदत होणार असून, शेतमाल विक्रीसाठी बाजारभाव, देश, परदेशातील बाजारपेठ, शेतमाल निर्यातीची महिती मिळणार असून, ही माहिती तातडीने शेतकऱ्यांना देता येणार आहे. कृषी विद्यापीठ, आयटी व उद्योगजक मिळून विदर्भात गावागावात उद्योग निर्माण करू न विद्यार्थी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.

आयटी सेंटर मिळाल्यास कृषी संशोधनाला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कृषी विकास साधता येणार आहे. कृषीसाठी लागणारी यंत्र विकसित करता येतील तद्वतच आयटी, कृषी विद्यापीठ व उद्योजक मिळून विदर्भात गावागावात शेतमाल प्रक्रिया उभारू न रोजागार उभारता येणार आहे. केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यासंदर्भात हिरवी झेंडी दाखविल्याने प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ