शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तहसील प्रशासनाने मागितली ‘त्या’ प्रकरणाची माहिती

By admin | Updated: March 23, 2017 02:46 IST

तुर खरेदीचे प्रकरण; तेल्हारा बाजार समितीत खळबळ

तेल्हारा, दि. २२- नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍याच्या नावावर व्यापार्‍यांची तूर अवैधरीत्या मोजल्या जात असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती नायब तहसीलदारांनी मागितली असून, ही माहिती वरिष्ठांकडे पाठवणार असल्याचे सांगितले. २२ मार्च रोजी शेतकर्‍यांनीही तहसीलदारांना निवेदन देऊन नाफेडच्या केंद्रावर होणारे गैरप्रकार थांबवण्याची मागणी केली आहे. तेल्हारा येथील बाजार समितीच्या यार्डमध्ये नाफेडच्यावतीने तूर खरेदी करण्यात येत आहे. या केंद्रावर दोन बोगस पावत्यांवर व्यापार्‍याचा माल शेतकर्‍याच्या नावाने विकल्याचा प्रकार लोकमतने उघडकीस आणला आहे. लोकमतच्या या वृत्तामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत खळबळ उडाली आहे. बाजार समितीच्या संचालकांची तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच तेल्हाराचे नायब तहसीलदार भारत किटे यांनी सदर प्रकरणाची नाफेड आणि बाजार समितीची सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार असल्याचे किटे यांनी सांगितले. तसेच आज शेतकर्‍यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून, केंद्रावर माप धिम्या गतीने होत असून, काट्याची संख्या वाढविणे व गैरप्रकार थांबविण्याची मागणी केली आहे. निवेदनावर उत्तम नळकांडे, विजय बोर्डे, प्रदीप महल्ले, विशाल गाडेकर, महेश वडतकार, शुभम वडतकार, उमेश बाजोड, विजय वाकोडे, देवानंद वडतकार, अंकुश मिरगे, सागर पाथ्रीकर, धनंजय गावंडे, नीलेश वाकोडे, प्रशांत वाकोडे, सोपान सरोदे व पवन कोल्हे आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षरी आहेत. शेतकर्‍याची तूर लंपासतेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील गजानन दिनकर काकड यांनी आपल्या शेतातील उत्पादित तूर २६ फेब्रुवारी २0१७ रोजी नाफेडला विक्रीसाठी तेल्हारा बाजार समितीच्या यार्डमध्ये ३५ नग प्लास्टिक बारदान्यामध्ये विक्रीसाठी आणली. बाजार समितीच्या आवक नोंदप्रमाणे टोकन क्रमांक ८७८ त्यांना मिळाला. २0 मार्च रोजी सदर शेतकरी बाजार समितीच्या यार्डमध्ये आपला माल पाहण्यासाठी आले असता तीन कट्टे तूर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेच बाजार समितीचे सचिव माधव पाथ्रीकर यांना कळविले. वरिष्ठांच्या आदेशानुसार माहिती घेतली आहे. या प्रकरणात कुणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. - राजूसिंह राठोड, सहायक निबंधक, तेल्हारा