शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कापसावर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव; बियाणे कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:33 IST

अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

ठळक मुद्देतपासणी पथकाची शिफारस

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळी प्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.गुलाबी बोंडअळ्यांच्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील ९0 टक्के नुकसान झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तालुका बीज निरीक्षक समितीने पाहणी करू न जिल्हा तक्रार निवारण समितीकडे अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार तक्रार निवारण समितीने जिल्हय़ातील बीटी कापूस क्षेत्राची पाहणी व तपासणी केली. त्यामध्ये बोंडअळीने कापसाचे नुकसान झाल्याचे समोर आल्याने बीटी बियाणे उत्पादक सहा कंपन्यांविरुद्ध अकोल्यात गुन्हे दाखल केले जाणार असल्याने वृत्त आहे. त्यासाठीची तयारी कृषी विभागाने केल्याचे समजते.

बोंडअळी प्रतिरोधक क्षमता काही दिवसांचीच! कपाशीचे पीक १८0 ते २00 दिवसांचे आहे; पण बीजी-१ व बीजी-२ कापसामध्ये बोंडअळीला प्रतिरोधक जिन केवळ ९0 ते १२0 दिवसांचाच आहे. दरम्यान, यावर्षी सुरुवातीपासूनच पूर्वमोसमी व खरीप हंगामातील कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे शेतकर्‍यांनी तक्रारीत नमूद केले. बियाणे उत्पादक कंपन्यांनी शेतकर्‍यांची ही फसवणूकच केल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यासोबत संबंधित कंपन्यांवर गुन्हे दाखल करावे, यावर शेतकर्‍यांचा जोर होता. जिल्हा तक्रार निवारण समिती पथकाच्या तपासणीतही हे तथ्य आढळून आल्याने कृषी विभागाच्यावतीने गुन्हे दाखल करणार आहे. सतत तीन दिवस सुटी आल्याने २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरcottonकापूस