शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

अकोल्यात टेक्सटाईल पार्क, दाल मिल हब उभारण्यासाठी प्रयत्न करणार - उद्योग मंत्री सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:25 PM

अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.

ठळक मुद्दे अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने एमआयडीसी परिसरात आयोजित अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज मशीनरीज व फुड प्रोसेसिंग प्रदर्शनाचे उदघाटन.प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर देसाई व मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट दिली. हे प्रदर्शन ७ जानेवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी येथे दिली.अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने एमआयडीसी परिसरात आयोजित अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज मशीनरीज व फुड प्रोसेसिंग प्रदर्शनाचे उदघाटन उद्योग मंत्री देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष कैलास खंडेलवाल, संस्थापक अध्यक्ष भीमराव धोत्रे, बुलडाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक आदी मंचावर उपस्थित होते.शेतकºयांच्या विकासासाठी शेतमालावर आधारीत प्रक्रीया उद्योग जास्तीतजास्त प्रमाणात उभारणे गरजेचे असून त्यासाठी फुड प्रोसेसिंग सारखे प्रदर्शन दिशादर्शक आहे, असे सांगून देसाई म्हणाले की, अकोला येथे दाल मिल हब उभारण्यासाठी उदयोग विभागाकडून निर्णय घेतला जाईल. राज्यात एकूण दहा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, यापैकी अमरावती येथे पहिला टेक्साटाईल पार्क उभारण्यात आला आहे. पुढील टेक्साटाईल पार्क उभारण्यासाठी अकोल्याला प्राधान्य दिले जाईल. सोबतच कौशल्य विकास केंद्रही उभारण्यात येईल.देसाई पुढे म्हणाले की, एमआयडीसीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. महान धरणातून एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याबाबत निर्णय घेतला जाईल. पाण्यासाठी तात्काळ ज्या उपाययोजना करता येतील, त्या केल्या जातील. एमआयडीसीच्या विभागीय कार्यालयाचा प्रश्नही सोडविल्या जाईल, तोपर्यंत विभागीय व्यवस्थापकांनी आठवडयातील दोन दिवस अकोला येथे थांबून कामकाज पाहावे, त्याचा अहवाल दर आठवडयाला आपल्याकडे पाठवावा. अकोला येथील विमानतळाबाबतच्या अडचणी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करुन सोडविल्या जातील,असेही त्यांनी सांगितले.प्रास्ताविक कैलास खंडेलवाल यांनी केले. यावेळी एक्स्पो हँडबुकचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर देसाई व मान्यवरांनी प्रदर्शनातील स्टॉलला भेट दिली. हे प्रदर्शन ७ जानेवारी पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

प्रगतीसाठी शेतीला यंत्र आणि तंत्राची जोड गरजेची - रणजीत पाटीलयावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, शेतकºयांच्या प्रगतीसाठी शेतीला यंत्र आणि तंत्राची जोड मिळणे आवश्यक आहे. त्यासोबतच शेतकºयांनी शेतीसोबतच जोडधंदे करावेत, त्याकरीता शासनाकडून शेतकºयांना निश्चितपणे सहकार्य केले जाईल. अकोला येथील एमआयडीसी क्षेत्रातील पाणी प्रश्न, विमानतळाबाबतच्या समस्या सोडविल्या जातील. उदयोजकांना लागणारे कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी येत्या काही महिन्यात कौशल्य विकास केंद्रही उभारले जाईल. यावेळी महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळSubhash Desaiसुभाष देसाई