शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा पहिला हुमोनॉइड यंत्रमानव येणार अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 13:45 IST

यंत्रमानव(रोबोट) ‘इंद्रो’ अकोल्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव येथे ७ मार्च रोजी येणार आहे.

अकोला: भारताचा पहिला हुमोनॉइड अर्थात माणसासारखा कृतीशील यंत्रमानव(रोबोट) ‘इंद्रो’ अकोल्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव येथे ७ मार्च रोजी येणार आहे. त्यानिमित्ताने महाविद्यालयात टेक्नॉब्लिट्झ २0२0 हा टेक्निकल उपक्रमसुद्धा आयोजित केला आहे.‘इंद्रो रोबोट’ हा अकोल्यात येत असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना या यंत्रमानवाची भेट घालून संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. हा यंत्रमानव स्वयंचलित असून, तो कसा चालतो, बोलतो, कसा काम करतो हे सुद्धा विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. ही अकोलेकरांसाठी मोठी उपलब्धी आहे. यासोबतच विविध भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पेपर प्रझेंटेशन, प्रोजेक्ट व मॉडेल एक्स्पो,रोबो रेस, ब्लाइंड रेस, टॅलेंट हंट, आयपीएल आॅक्शन,पबजी, एनएफएस, कॉल आॅफ ड्युटी या अशा स्पर्धा घेण्यात येणार आहेत, तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात येणार आहे. विशेष आकर्षण असणार आहे ते म्हणजे ‘हुमोनॉइड रोबोट शो’. हा शो ७ मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. यादरम्यान अकोलेकर नागरिक, शाळेतील विद्यार्थी,या रोबोटशी संवाद साधू शकतील. इंद्रो यंत्रमानवाच्या अकोला भेटीचा अकोलेकर नागरिकांसह विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे महाविद्यालयाचे आवाहन प्राचार्य डॉ.एस. के.देशमुख, समन्वयक डॉ. एस.एल. सातारकर, प्रा. एस.ए. अवचार यांनी केले आहे.  

 

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञानRobotरोबोट