शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या दृष्टीने स्वतंत्र विदर्भ राज्य गरजेचे - अँड. श्रीहरी अणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:58 IST

अकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील विकासाला गती मिळू शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीहरी अणे यांनी येथे व्यक्त केले. 

ठळक मुद्देअकोला बार असोसिएशन कार्यालयाला सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेवटर्कअकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय येथील विकासाला गती मिळू शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अँड. श्रीहरी अणे यांनी येथे व्यक्त केले. अकोला बार असोसिएशनच्या कार्यालयाला त्यांनी गुरुवारी दुपारी  सदिच्छा भेट दिली. यावेळी बार असोसिएशनतर्फे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.झेड. ख्वाजा, ज्येष्ठ विधिज्ञ अँड. बी.के. गांधी, अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष अँड. गजानन खाडे, जिल्हा सरकारी वकील अँड. राजेश्‍वर देशपांडे आदी होते.  यावेळी अँड. जोशी यांनी श्रीहरी अणे यांचे स्वागत केले. अँड. अणे यांनी, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड यांची निर्मिती मोठय़ा राज्यांमधूनच झाली. मोठय़ा राज्यांमध्ये समाविष्ट असल्यामुळे हे छोटे भाग विकासापासून वंचित होते; परंतु या सर्व लहान राज्याची निर्मिती झाल्यानंतर, त्यांचा झपाट्याने विकास झाला. विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा झाल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही. विदर्भावर सातत्याने अन्याय होत आला, असे अँड. श्रीहरी अणे म्हणाले. विदर्भ राज्यात मोठी खनिज संपत्ती, नैसर्गिक संपत्ती आहे; परंतु त्याचा वाटाही महाराष्ट्र विदर्भाला देत नाही. निवडणुका आल्या की राजकीय पक्ष वेगळय़ा विदर्भाची भूमिका मांडतात आणि निवडणुका संपल्या की वेगळय़ा विदर्भाचा मुद्दा विसरतात. विदर्भाचा विकास साधायचा असेल, तर वेगळय़ा राज्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच आपण वेगळय़ा विदर्भ राज्य निर्मितीसाठी जनजागृती करण्यासाठी दौरा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन बार असोसिएशनचे वरिष्ठ सचिव अँड. अनुप देशमुख यांनी केले. आभार सचिव मो. इलियास शेखानी यांनी मानले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरShrihri Anneश्रीहरी अणे