शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांकरिता आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:59 IST

विदर्भ राज्य व शेतकर्‍यांचे प्रश्न  कायम आहेत.  त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन  म्हणून ११ डिसेंबर ला विदर्भ बंद करिता जय्यत  तयारी सुरु असल्याचे  माजी आमदार अँड.वामनराव चटप  यांनी कार्यकर्त्यांंच्या  बैठकीत सांगितले. 

ठळक मुद्देवामनराव चटप यांची माहिती११ डिसेंबर ला विदर्भ बंद आंदोलन 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : स्वतंत्र्य विदर्भ राज्य देऊ, शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जातून मुक्त करु, शे तमालावर उत्पादन खर्च व ५0 टक्के नफा एवढा हमीभाव देऊन, विजेचे बिल कमी  करु, भारनियमन संपवू, शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करु अशा प्रकारची  आश्‍वासने व जाहीरनामे दिले. परंतु विदर्भ राज्य व शेतकर्‍यांचे प्रश्न  कायम आहेत.  त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन  म्हणून ११ डिसेंबर ला विदर्भ बंद करिता जय्यत  तयारी सुरु असल्याचे  माजी आमदार अँड.वामनराव चटप  यांनी कार्यकर्त्यांंच्या  बैठकीत सांगितले. अकोट येथे शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीची बैठक  २१ नोव्हेंबर  रोजी पार पडली. विदर्भ बंद आंदोलनाच्या दृष्टीने विदर्भाच्या तालुका पातळीवर  बैठका घेण्यात येत आहेत. आकोटमध्ये सुध्दा या संदर्भात घेण्यात आलेल्या  बैठकीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे, पश्‍चिम विदर्भ  प्रमुख रंजना तायडे, शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, सतिष देशमुख, सुरेश जोगले,  लक्ष्मीकांत कौठकर, प्रफुल्ल बदरखे, विक्रांत बोंद्रे, रमेश रहाटे, गोपाल निमकर्डे,  दिनेश गिर्‍हे, सुरेश सोनोने, निलेश नेमाडे, अक्षय ओरबारे, प्रकाश बोंद्रे, राजकुमार  निमकर्डे, रामकिशोर थुटे, अविनाश गावंडे, दिनेश देऊळकार, मंगेश रेळे यांच्यासह  शेतकरी संघटना व विदर्भ राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विदर्भ  बंद मध्ये विदर्भवादी विविध संघटना सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात  आली. 

टॅग्स :Wamanrao Chatapवामनराव चटपakotअकोट