शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगाचे वाढते प्रमाण ठरत आहे धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 12:39 IST

अकोला : जगभरात कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या १८ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे.

अकोला : जगभरात कुष्ठरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, यातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचा धक्कादायक खुलासा जागतिक आरोग्य संघटनेच्या १८ जानेवारी रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालातून करण्यात आला आहे. या आजारावर पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.जागतिक आरोग्य संघटनेतर्फे २०१६-२० या कालावधीमध्ये कुष्ठरोगाच्या मुक्ततेसाठी एक पंचवार्षिक योजना राबविण्यात येत आहे. त्यांतर्गत दरवर्षी या आजाराचा सर्व्हे करण्यात येतो. जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या एका सर्व्हेच्या अहवालानुसार जगातील ५० टक्के कुष्ठरोगी भारतात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार ब्राझील, दक्षिण अफ्रिका या देशांसोबतच भारतातही कुष्ठरोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे. जगात दरवर्षी दोन लाख कुष्ठरोगी समोर येत असून, त्यातील एक लाख कुष्ठरोगी भारतात आहेत. या आजारावर पुरेशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने देशात या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.काय सांगतो अहवाल?जगभरात दरवर्षी दोन लाख कुष्ठरोगी आढळतात. यातील एक लाख कुष्ठरोगी भारतात आढळतात.कुष्ठरोग्यांसाठी पुरेशा आरोग्य सुविधा भारतात आज उपलब्ध नसल्यामुळे अनेक समस्या भारतात उद्भवत आहेत.गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील कुष्ठरोग्यांच्या प्रमाणामध्ये लक्षणीय घट झाली असून, सरकारच्या प्रयत्नांमुळे ही घट होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.अज्ञान अन् भेदभावामुळे आजाराचे प्रमाण सर्वाधिककुष्ठरोगाबद्दल असलेली अनास्था तसेच कुष्ठरोग्यांसोबत मोठ्या प्रमाणात भेदभाव केल्या जातो. यासोबतच या आजाराविषयी असलेल्या अज्ञानामुळे कुष्ठरोग झपाट्याने वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 

कुष्ठरोगाबद्दल अज्ञान व भेदभाव यामुळे कुष्ठरोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच यावर उपचार मिळाल्यास त्यावर नियंत्रण मिळवू शकतो.- डॉ. प्रशांत वानखडे

 

टॅग्स :AkolaअकोलाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना