शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकिरी वाढली...कोरोनाही वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 12:04 IST

रस्ते, बाजारपेठा, बसस्थानकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिल्या जात असल्याने संपर्कातून संसर्ग वाढत आहे.

अकोला : ‘अनलॉक’च्या या प्रक्रियेत कोरोनाही ‘अनलॉक’ झाला असून, अकोलेकरांंच्या बेफिकिरीमुळे या अत्यंत घातक विषाणूचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रस्ते, बाजारपेठा, बसस्थानकांवर नागरिकांची मोठी गर्दी होत असून, कोविड प्रतिबंधात्मक नियमांना बगल दिल्या जात असल्याने संपर्कातून संसर्ग वाढत आहे.कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात असून, हळूहळू अनेक क्षेत्र खुली होत आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनलॉक-४ सुरू झाला असून, यामध्ये अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. आतापर्यंत बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक सेवाही बहाल करण्यात आली असून, आंतरजिल्हा प्रवासासाठी आवश्यक असलेली ई-पासची अटही रद्द करण्यात आली आहे. या विविध सवलती दिल्या जात असताना नागरिकांनी मास्क परिधान करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे; परंतु अनलॉकच्या प्रक्रियेत नागरिक अधिक बेफिकीर झाल्याचे चित्र अकोला शहरासह ग्रामीण भागात दिसून येत आहे. यामुळे आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सहा दिवसांत १३ मृत्यू व ५७६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडाही हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. वाढत्या रुग्णांचा भार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयावर येत आहे. या ठिकाणी अपुºया मनुष्यबळामुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे.ना मास्क...ना फिजिकल डिस्टन्सिंगएकीकडे अकोल्यात कोरोना थैमान घालत आहे, तर दुसरीकडे नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, फिजिकल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडत आहे. मास्क वापरण्याकडेही नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. बसस्थानक, दुकानांमध्ये अनेक जण बिनधास्तपणे विनामास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. या बेफिकिरीमुळे कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे.कारवाईचा धाकही संपला!कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मास्कचा वापर न करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यासाठी पथकही गठित करण्यात आले होते. नियमांचे उल्लंघन करणाºयांना मोठा दंड आकारण्यात येत होता. आता मात्र ही कारवाईच गुंडाळण्यात आली आहे. कारवाईचा धाकच नसल्याने नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला