शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लहान विद्यापीठांमुळे गुणवत्तेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 10:28 IST

अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे.

- राजेश शेगोकार लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शैक्षणिक गुणवत्तावाढीचा निकष डोळ्यासमोर ठेवून केंद्र शासनाने १९९२ मध्ये प्रा.यशपाल कपूर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात लहान विद्यापीठांमुळे शैक्षणिक गुणवत्ता वृद्धींगत होते, अशी शिफारस केली होती. या शिफारशीचा विचार केला तर अमरावती विद्यापीठांतर्गत वाढती महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शैक्षणिक गुणवत्तेसाठी या विद्यापीठाचे विभाजन करण्याची गरज आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सद्यस्थितीत ३८३ महाविद्यालये असून, यामध्ये अमरावती १२०, यवतमाळ ८२, अकोला ६१, वाशिम ३५, बुलडाण्याच्या ८५ महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठातील एकूण महाविद्यालयांच्या तुलनेत पश्चिम वºहाडात सर्वाधिक १८१ महाविद्यालये असल्याने विद्यापीठाला या महाविद्यालयांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे शक्य होताना दिसत नाही. दुसरीकडे वाढता प्रवास खर्च लक्षात घेता पश्चिम वºहाडातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात धाव घेणे आर्थिकदृष्या परवडत नाही. त्यामुळे लहान विद्यापीठ ही संकल्पना अतिशय उपयुक्त ठरू शकते. प्रा.यशपाल समितीने केंद्र शासनाला दिलेल्या अहवालात यासंदर्भात स्पष्ट शिफारस केली असून, विद्यापीठांची व्याप्ती लहान असल्यास गुणवत्तेत सातत्य राखून सुधारणा करता येते, असे नमूद केले आहे. राष्टÑीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात ‘रूषा’ या संस्थेनेही लहान विद्यापीठांची पाठराखण केली आहे. विद्यापीठांशी संलग्नीत महाविद्यालयांची संख्या वाढली तर गुणवत्तेमध्ये घसरण होते, असा इशारा या संस्थेने दिला आहे. अमरावती विद्यापीठाची व्याप्ती व वाढता पसारा लक्षात घेता या विद्यापीठाचे विभाजन करून पश्चिम वºहाडासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे.केवळ एका जिल्ह्यासाठी सोलापुरात विद्यापीठपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे केवळ एका जिल्ह्यासाठी तयार करण्यात आलेले विद्यापीठ आहे. केवळ राजकीय इच्छाशक्तीमुळे हे विद्यापीठ होऊ शकले. हीच इच्छाशक्ति गडचिरोली आणि चंद्रपूर या अवघ्या दोन जिल्ह्यांच्या गोंडवाना विद्यापीठासाठीसुद्धा दृष्टीस पडली. पश्चिम वºहाडात दिग्गज राजकारणी असतानाही दोन दशकांपासून विद्यापीठाचे उपकेंद्रही आणता आले नाही, त्यामुळे राजकीय नेतृत्वाला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहेच, सोबतच आता उस्मानाबादच्या निमित्ताने स्वतंत्र विद्यापीठाचीच मागणी रेटून धरण्याचीही संधी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र