शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे देगावच्या शाळेत विद्यार्थी संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 14:06 IST

गावातील व परिसरातील सर्वच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून, येथील १०० टक्के पटनोंदणी केली जाते.

वाडेगाव: बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या देगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित असल्यामुळे विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.या उपक्रमात लहान मुलांची बचत बँक व हेल्प बॉक्स हा उपक्रम सातत्यपूर्ण राबविला जात आहे. या शाळेत दर्जेदार शिक्षण दिल्या जात असल्याने खासगी कॉन्व्हेंटमधील दाखल विद्यार्थ्यांचा ओढा येथील जिल्हा परिषदेकडे वाढलेला आहे. गावातील व परिसरातील सर्वच विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून, येथील १०० टक्के पटनोंदणी केली जाते. या गावात शाळाबाह्य विद्यार्थी एकही आढळून आल्याने दिसत नाही.पालक सभा घेऊन विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांबाबत चर्चा केल्या जातात व पालकांच्या शंकांचे निरसन केल्या जाते. प्लास्टिक निर्मूलन, स्वच्छता अभियान, झाडे लावा-झाडे जगवा, स्वच्छ भारत अभियान यानुषंगाने सर्व शालेय कार्यक्रम शाळेत राबविले जातात. हेल्प बॉक्सच्या माध्यमातून पूरग्रस्तांना २ हजार ७५१ रुपयांची मदत केली गेली. त्याचबरोबर खुशी ठाकरे या विद्यार्थिनीच्या थॅलेसीमियाकरिता सात हजारांची मदत देण्यात आली. त्याचबरोबर गरीब व होतकरू मुलांना त्यातून साहित्य वाटप केले जाते.

विविध स्पर्धांच्या माध्यमातून विकास२००० ते २०१४ या पासून शाळेमध्ये आमूलाग्र बदल झाला असून, विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक दर्जा उंचावला. भौतिक सुविधांची पूर्तता केली जाते. विविध स्पर्धा घेऊन २६ जानेवारी रोजी प्रत्येकी २५१ रोख बक्षीस त्यामध्ये वक्तृ त्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, लेखन निर्मिती, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा, पाककला स्पर्धा, तसेच दिनांक तो पाढा इंग्रजीचे शब्द वाचन, इतर शालेय उपक्रम शाळेत राबविले जातात.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकाससुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानुषंगाने मुलांची तयारी करून घेतल्या जाते आणि त्याकरिता विद्यार्थ्यांबरोबर पालकसुद्धा प्रतिसाद देत आहेत.- दिनेश ठाकरे, मुख्याध्यापक

दिनेश ठाकरे मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा देगाव कॉन्व्हेंटच्या तुलनेचे शिक्षण आमच्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे गावातील पालकांचा या शाळेकडे ओढा वाढला आहे.- गणेश कोगदे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, देगाव.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळा