शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी मुदत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 15:27 IST

पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाच्या पुनर्रचनेसाठी शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ जुलै २०१९ पर्यंत पुनर्घटनेसाठी पात्र असलेल्या २५ हजार ४९२ लाभार्थींपैकी जिल्ह्यातील ८ हजार २७४ शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन झालेले आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेमार्फत १५ जुलै ते ३० जुलैपर्यंत पीक कर्ज वाटप पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात १४१ पीक कर्ज वाटप मेळावे घेण्यात आले होते. यात काही कारणामुळे अनेक शेतकºयांना इच्छा असूनही पीक कर्ज पुनर्गठन नाच्या योजनेचा लाभ मुदतीत घेता येऊ शकला नाही.दरम्यान, आजमितीस अकोला जिल्ह्यांमध्ये १७,२१८ शेतक ºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन या वाढीव मुदतीत करता येऊ शकेल. यासाठी शेतकºयांनी लेखी संमती संबंधित बँकेला देणे गरजेचे आहे. सर्वात जास्त स्टेट बँक आॅफ इंडियाकडे ८ हजार लाभार्थी आहेत, तसेच सेंट्रल बँक आॅफ इंडिया यांच्यामार्फत ३ हजार शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला यांच्यामार्फत २ हजार ९५५ तर बँक आॅफ महाराष्ट्र मार्फत १,२८४ शेतकºयांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन होऊ शकते. आतापर्यंत पीक कर्जाच्या पुनर्गठनामध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएन्टल बँक आॅफ कॉमर्स व युनियन बँक आॅफ इंडिया यांनी उल्लेखनीय काम केल्याचे दिसून येत आहे.

मागील वर्षांमध्ये पीक कर्ज घेतलेल्या व काही कारणास्तव सदर पीक कर्जाची परतफेड करू न शकलेल्या या शेतक ºयांना जुन्या कर्जाचे पुनर्गठन केल्यास नवीन कर्ज वाटपसुद्धा मिळू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांनी पीक कर्ज पुनर्गठन योजनेच्या या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा.- डॉ. प्रवीण लोखंडे,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अकोला.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरीAkolaअकोला