शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर वसुलीतून ४८ कोटींचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:54 IST

सुधारित दरवाढ केल्यानंतर सर्वसाधारण सभेने वाढीव रकमेतून ५0 रुपये कमी केल्यामुळे कर स्वरूपातील उत्पन्नाची गाडी ४८ कोटींवर येऊन ठेपली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

ठळक मुद्देमनपा आयुक्तांची पत्रकार परिषदेत माहितीयापुढे ऑनलाइन भरणा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नवीन प्रभाग वगळता शहरातील मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नागरिकांचे आक्षेप निकाली काढण्यात आले. पुनर्मूल्यांकनामुळे ३१ हजार मालमत्तांवर कधीही कर लागू नसल्याचे समोर आले. सुधारित दरवाढ केल्यानंतर सर्वसाधारण सभेने वाढीव रकमेतून ५0 रुपये कमी केल्यामुळे कर स्वरूपातील उत्पन्नाची गाडी ४८ कोटींवर येऊन ठेपली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मनपाच्या उत्पन्न वाढीसाठी मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची गरज असल्याचे समोर आले. त्यासाठी ‘जीआयएस’ प्रणालीचा वापर केल्यामुळे यापूर्वी कधीही कर लागू नसलेल्या तब्बल ३१ हजार मालमत्ता उघडकीस आल्या. मनपाला मालमत्ता करापासून अवघे १८ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत असे. त्यामध्ये भरीव वाढ झाल्याचे मनपा आयुक्त अजय लहाने यांनी सांगितले. नवीन प्रभाग वगळून शहरात १ लाख ५ हजार १६७ मालमत्तांची नोंदणी झाली आहे. सुधारित दरानुसार ७१ कोटी ५0 लाख रुपये मिळतील, असा प्रशासनाचा अंदाज होता. सर्वसाधारण सभेने वाढीव ९0 रुपये दर रकमेतून थेट ५0 रुपये कमी केल्यामुळे उत्पन्नाचा आलेख घसरला. सर्वसाधारण सभेच्या निर्णयामुळे उत्पन्नाचा आकडा ५९ कोटींवर आला असून, शिक्षण उपकर व रोहयो करापोटी शासनाकडे ११ कोटी रुपये जमा करावे लागतील. यामुळे मनपाच्या तिजोरीत ४८ कोटींची भर पडणार आहे. नवीन प्रभागात मालमत्तांच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निश्‍चितच मनपाच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार असल्याचा विश्‍वास आयुक्त लहाने यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला उपायुक्त समाधान सोळंके, सहायक आयुक्त डॉ. दीपाली भोसले उपस्थित होत्या. 

यापुढे ऑनलाइन भरणामालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी पावती पुस्तकाचा वापर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यानंतर ऑनलाइन प्रणालीद्वारे तसेच पॉस मशीनद्वारे थेट घरबसल्या कराचा भरणा करता येईल. शहरातील कोणत्याही मालमत्ताधारकाची माहिती अकोलेकरांना संगणकावर उपलब्ध असेल. यामुळे लपवाछपवीला आपसूकच आळा बसणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

स्वच्छतेसाठी पुन्हा अभियानशहर हगणदरीमुक्त झाल्यानंतर राज्य शासनाच्या चमूने तपासणी केली होती. जानेवारी महिन्यात स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जाणार असून, या कालावधीत केंद्र शासनाद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी उपायुक्त समाधान सोळंके यांनी केले.