शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त बिल्डर नरहरशेट्टीवार यांच्या संपत्तीवर प्राप्तीकर विभागाची टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 15:04 IST

अकोला: गृहनिर्माणाचे गोंडस स्वप्न दाखवून राज्यभरातील भोळ््या-बाबड्या लोकांची फसवणूक करणाऱ्या वादग्रस्त बिल्डर सतीश नरहरशेट्टीवार आणि त्यांच्या पत्नी कविता यांच्या वर्धा येथील जंगम मालमत्तेतून कर वसुलीसाठीची कारवाई प्राप्तीकर विभागाने सुरू केली आहे.

ठळक मुद्दे नागपूर प्राप्तीकर विभागाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे फसगत झालेले नागरिक हादरले आहे. प्राप्तीकर थकविल्यापोटी नरहरशेट्टीवार यांच्यावर २ कोटी ४५ लाख ८६ हजार ५८९ वसुलपात्र ठरली आहे.

- संजय खांडेकर

अकोला: गृहनिर्माणाचे गोंडस स्वप्न दाखवून राज्यभरातील भोळ््या-बाबड्या लोकांची फसवणूक करणाऱ्या वादग्रस्त बिल्डर सतीश नरहरशेट्टीवार आणि त्यांच्या पत्नी कविता यांच्या वर्धा येथील जंगम मालमत्तेतून कर वसुलीसाठीची कारवाई प्राप्तीकर विभागाने सुरू केली आहे. नागपूर प्राप्तीकर विभागाने सुरू केलेल्या या कारवाईमुळे फसगत झालेले नागरिक हादरले आहे. त्यात अकोल्यातील फसगत झालेले ४० जणही आहेत.वर्धा येथील बिल्डर नरहरशेट्टीवार यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी स्वस्त दरात शेत विकत घेतले. त्यानंतर लेआउट टाकून गृहनिर्माणाचे प्रकल्प उभारल्या जात असल्याचा प्रचार केला. त्यानंतर आकर्षक बक्षीस योजनेचे आमिष दाखवून भूखंडांची विक्री केली. ही फसवणूक केवळ नागपूर, वर्धा येथेच नव्हे तर राज्यभरात केली गेली. अकोल्यातील राष्ट्रीय महामार्गालगत रिधोरा हद्दीत गजानन नगरीत दहा एकर शेत घेऊन नरहरशेट्टीवार यांनी असाच प्रकल्प काही वर्षाआधी सुरू केला. ४० लोकांनी त्यात लाखो रुपयांची गुंतवणूक केली; मात्र काही महिन्यातच हा प्रकल्प वांद्यात सापडला. आता अकोल्यातील नागरिकांना नरहरशेट्टीवारचे उंबरठे झिजवण्याची वेळ आली आहे. ज्या लोकांनी प्लॉटची रीतसर खरेदी केली, त्यांना प्लॉटचा ताबा मिळाला. ज्यांनी न्यायालयात धाव घेतली त्यांनादेखील मोबदला मिळाला. याप्रकरणी ज्यांनी अद्याप तक्रार केली नाही, अशा लोकांतही अनेक जण आहेत. ते नरहरशेट्टीवारच्या भूलथापांना बळी पडले आहे. दरम्यान, प्राप्तीकर थकविल्यापोटी नरहरशेट्टीवार यांच्यावर २ कोटी ४५ लाख ८६ हजार ५८९ वसुलपात्र ठरली आहे. वर्धा येथील विविध जंगम मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया प्राप्तीकर विभाग नागपूरचे अधिकारी अनुजकुमार यांनी सुरू केली आहे. प्राप्तीकर विभागाने ही संपत्ती जप्तीची कारवाई केली तर फसगत झालेल्या सर्वसामान्यांना गुंतलेली रक्कम मिळणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाIncome Taxइन्कम टॅक्स