शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवा - रणजीत पाटील : जिल्हा कृषी महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:57 IST

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.

ठळक मुद्देकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

अकोला : सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहीजे, असे सांगत शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्यां  विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहीजे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी शुक्रवारी केले.कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विद्यापीठ परिसरात आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विलास भाले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक डॉ.सुभाष नागरे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ सभापती पुंडलीकराव अरबट, नगरसेवक हरिष आलीमचंदाणी, डॉ.हेमंत बोराडे, डॉ.उमेश ठाकरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, कृषी विकास अधिकारी हनुमंत ममदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते.देशाचे पहिले कृषीमंत्री दिवंगत डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी विदर्भातील काळ्या मातीत मोेती पिकविण्याचे स्वप्न पाहीले होते, असे सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी संबंधित यंत्रणांकडून जास्तीत -जास्त काम कसे होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले. निसर्ग जेव्हा साथ देत नाही, तेव्हा खारपानपट्टयात एका पाण्याअभावी शेतकऱ्यां चे पीक जाते, अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी साडेचार हजार कोटींची दिवंगत नानासाहेब देशमुख बळीराजा कृषी संजिवनी योजना मुख्यमंत्र्यांनी सुरु केली असून, शेतीला पाणी आणि वीज मिळाल्यास शेतकरी कोणाचाही मोताद राहणार नाही, असही पालकमंत्री डॉ.पाटील यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सुरेश बाविस्कर यांनी केले.संचालन बाळकृष्ण बिडवई व विकास पल्हाडे यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले.‘सात-बारा’सोबतच जमीन आरोग्य पत्रिका द्या !जमीनीत काय कमी आहे, यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती मिळावी, यासाठी दोन वर्षात प्रत्येक शेतकºयाला सात-बारा सोबतच जमीन आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड ) देण्यासाठी कृषी विभाग ‘आत्मा’ आणि कृषी विद्यापीठाने प्रयत्न करावे, असेही पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी सांगीतले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Agro Festival 2018अकोला जिल्हा कृषी महोत्सव २०१८guardian ministerपालक मंत्री