शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांच्या हाताला कामांची मागणी वाढली

By संतोष येलकर | Updated: May 4, 2024 14:53 IST

जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर १० हजार मजुरांची उपस्थिती

अकोला : दुष्काळसदृश परिस्थिती आणि पिकांची उलंगवाडी झाल्याने तापत्या उन्हाच्या दिवसांत शेतीची कामे नसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मजुरांच्या हाताला कामांची मागणी वाढली आहे. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या १ हजार ७२० कामांवर १० हजार ३५ मजुरांची उपस्थिती असल्याचे वास्तव आहे.

गेल्या पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे गेल्या ऑगस्टमध्येच शासन निर्णयानुसार जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. शेतातील कोरडवाहू पिकांची दोन महिन्यांपूर्वीच उलंगवाडी झाल्याने, शेतीची कामेही थांबली आहेत. त्यामुळे तापत्या उन्हाळ्यात ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी मजुरांकडून होणाऱ्या मागणीत वाढ झाली असून, सद्य:स्थितीत जिल्ह्यातील विविध भागांत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना रोजगाराचा आधार मिळाला आहे.

१,७२० कामांवर १०,०३५ मजूर !तालुका कामे मजूर उपस्थितीअकोला ३९४ २९३६अकोट २५९ १०२०बाळापूर १७८ ७९३बार्शिटाकळी २५० १६२८मूर्तिजापूर २८५ १७०८पातूर २१६ १३८३तेल्हारा १३८ ५६७

महिनाभरात ६,८३५ मजुरांची वाढली उपस्थिती !जिल्ह्यातील रोहयो कामांवर गेल्या ८ एप्रिलपर्यत ३ हजार २०० मजुरांची उपस्थिती होती. त्यानंतर ३ मे पर्यंत जिल्ह्यातील रोहयो कामांवरील मजुरांची उपस्थिती १० हजार ३५ इतकी झाल्याने, महिनाभरात ६ हजार ८३५ मजुरांची उपस्थिती वाढल्याचे चित्र आहे.

अशी आहेत सुरू कामे!रोहयोअंतर्गत जिल्ह्यात सध्या घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन आदी कामे सुरू आहेत.

मागणी येताच कामे उपलब्ध करून द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश !रोहयोअंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील तहसीलदार व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना २ मे रोजी आढावा बैठकीत दिले. तालुकास्तरावरील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन रोहयो कामांची गती वाढविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.