शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शाळांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 15:47 IST

केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने २0 जानेवारी रोजी दिल्या आहेत.

अकोला : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे आणि त्यासाठी शाळांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण ठेवून शाळांची नियमित तपासणी, पर्यवेक्षण व्हावे. या उद्देशातून आता केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने २0 जानेवारी रोजी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी यापूर्वीच अकोल्यात हा निर्णय राबविण्यास सुरुवात केली आहे.विद्यार्थी व शिक्षकांना प्रशिक्षण व मदत पुरविण्यामध्ये केंद्र शाळा महत्त्वाची भूमिका बजावते. शिक्षकांमध्ये सतत व्यावसायिक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक शैक्षणिक व अभ्यासक्रमविषयक प्रणाली सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शाळांच्या अंतर्गत नियमित भेटी व मासिक बैठका आयोजित करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्र शाळेला त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांना नियमित भेटी देऊन, त्याद्वारे त्यंना प्रत्यक्ष शैक्षणिक मदत पुरविण्यासाठी आणि त्याचा अहवाल प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यासाठी प्रोजेक्ट अ‍ॅप्रुव्हल बोर्ड अंतर्गत २0१९-२0 साठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे केंद्र प्रमुखांसाठी शाळांमधील पायाभूत सुविधा, शिक्षक, विद्यार्थी व इतर शैक्षणिक बाबींची नियतकालिक तपासणी करण्यासाठी प्रश्नसंच, सूचना तयार करण्यात आल्या आहेत. केंद्र शाळा ही शैक्षणिक संशोधन संस्था म्हणून शिक्षकांसाठी काम करणार असून, केंद्र प्रमुखाने शाळेतील शैक्षणिक समस्यांवर दर महिन्याला बैठक घेऊन शाळेच्या कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. तसेच शाळाबाह्य मुलांना त्यांच्या वयानुसार शाळेत दाखल करून घेणे, प्रत्येक शाळेस दोन महिन्यांतून एक भेट देऊन शिक्षकांना शैक्षणिक मदत पुरविण्याचेसुद्धा सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र