अकोला: जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असले तरी इमारतीच्या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता होती. याबाबतचा प्रस्ताव पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे ठेवला होता. ही सुधारित प्रशासकीय मान्यता बुधवारी राज्य शासनाने दिल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. याशिवाय पातूर येथील न्यायालयाच्या फर्निचरचे काम रखडले होते. त्यामुळे इमारत हस्तांतरणात अडथळे येत होते. या इमारतीतील फर्निचरसाठीच्या निधीच्या प्रस्तावालाही बुधवारी मान्यता देण्यात आली. त्यामुळे या इमारतीच्या हस्तांतरणाचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
न्यायालयाच्या इमारतीला सुधारित प्रशासकीय मान्यता
By admin | Updated: March 17, 2016 02:36 IST