शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नेर धामणा बॅरेजमधून पाणीपुरवठा अशक्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 10:42 IST

नीरी यांनी दिलेल्या तपासणी अहवालात पूर्णा नदीचे पाणी प्रचंड दूषित असून, ते पाणीपुरवठा योजनांसाठी वापरू नये, असा इशारा आधीच दिलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खारपाणपट्ट्यातील गावांसाठी तयार झालेल्या नेर धामणा (पुर्णा) बॅरेजमधून कोणतीही पाणीपुरवठा योजना निर्मिती होणार नाही. त्यासाठी पूर्णा नदीकाठावर असलेल्या ७० ते ७५ गावांना यापुढेही इतर स्त्रोतांवरच अवलंबून राहावे लागणार आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी कवठा व नया अंदुरा लघू पाटबंधारे योजनेतून नवीन योजनांच्या निर्मितीचे पर्यायी प्रस्ताव तयार करण्याची वेळ पाणीपुरवठा विभागावर आली आहे. राष्ट्रीय पर्यावरण, अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) यांनी दिलेल्या तपासणी अहवालात पूर्णा नदीचे पाणी प्रचंड दूषित असून, ते पाणीपुरवठा योजनांसाठी वापरू नये, असा इशारा आधीच दिलेला आहे.पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पर्यावरण, अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) नागपूरसोबत सामंजस्य करार केला. कराराप्रमाणे पहिल्या टप्प्यात १२ जिल्ह्यांतील पाणी नमुने तपासणीसाठी देण्यात आले. त्यामध्ये खारपाणपट्टा असलेले अमरावती, अकोला व नागपूर जिल्ह्यातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली.अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीतील पाण्याचे नमुने तपासण्यात आले. त्यामध्ये पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेला देण्यात आला. त्यासोबतच पूर्णा नदीच्या पाण्यावर कोणती प्रक्रिया करावी, याबाबतही निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यामुळे धामणा बॅरेजमध्ये पाण्याची साठवण सुरू झाली तरी त्यातून पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणारच नाही.22 गावांच्या अपेक्षेवर फिरले पाणीअकोला तालुक्याच्या खारपाणपट्ट्यातील कायम टंचाईग्रस्त २२ गावांमध्ये आगर, उगवा, पाळोदी, नवथळ, सुकोडा, कानडी, अमानतपूर, मोरगाव (भाकरे), खडकी टाकळी, माझोड, निराट, सांगवी खुर्द, भोड, सांगवी मोहाडी, धामणा, सिसा, मासा, निपाणा, लोणाग्रा, दुधाळा, मंडाळा, टाकळी जलम, वैराट राजापूर, कंचनपूर व गोपालखेड या गावांचा समावेश आहे.भूगर्भातील पाणी पातळी लक्षात घेता भूपृष्ठावरील जलस्रोतातून या गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना उभारण्याची गरज आहे. त्यासाठी माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी योजनेचा प्रस्ताव तयार करण्याचेही पाणीपुरवठा विभागाला निर्देश दिले होते. नीरीच्या अहवालामुळे त्यावर पाणी फिरले आहे.तपासणीमध्ये उघड झाले विषारी घटकपाण्याच्या नमुन्यांमध्ये जड धातू प्रकारातील तांबे, लोह, झिंक,नायट्रेटसह नऊ घटक, कीटकनाशके प्रकारातील एंडोसल्फान, अ‍ॅल्ड्रीन, डिकोफोलसह ५ घटक, रसायने प्र्रकारातील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या घटकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी काही घटकांचे प्रमाण प्रचंड असल्याचे अहवालात पुढे आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाNer-Dhamna Barrageनेरधामणा बॅरेज