शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव लोकमतचा : ‘त्या’ १२० रास्तभाव दुकानांना धान्य पुरवठा करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 13:01 IST

‘लोकमत’मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत, जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी दिले.

अकोला: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना जून महिन्याचे धान्य वितरित करण्यासाठी जिल्ह्यातील ९४० रास्तभाव दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला असला तरी, १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही, अशा आशयाचे वृत्त मंगळवार, ४ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत जून महिन्यात जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरित करण्यासाठी गहू व तांदुळाचा धान्यसाठा मंजूर करण्यात आला. त्यानुसार ३ जूनपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ६० रास्तभाव दुकानांपैकी ९४० दुकानांमध्ये धान्याचा पुरवठा करण्यात आला असून, उर्वरित १२० रास्तभाव दुकानांमध्ये अद्याप धान्य पोहोचले नाही. त्यामुळे संबंधित रास्तभाव दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारक लाभार्थींना रास्त भावाच्या धान्याचे वितरण सुरू करण्यात आले नाही. असे वृत्त ४ जून रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. या वृत्ताची दखल घेत, अद्याप धान्य पोहोचले नसलेल्या जिल्ह्यातील संबंधित १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करून, शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण सुरू करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन सुरंजे यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना पत्राद्वारे दिले.जिल्ह्यातील ९४० रास्तभाव दुकानांना धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. अद्याप धान्य पोहोचले नसलेल्या जिल्ह्यातील १२० रास्तभाव दुकानांना तातडीने धान्याचा पुरवठा करून, रास्तभाव दुकानांद्वारे शिधापत्रिकाधारक लाभार्थींना धान्याचे वितरण सुरू करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना ४ जून रोजी पत्राद्वारे दिले आहेत.-गजानन सुरंजेउपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय