शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव लोकमतचा : कृषी तंत्र विद्यालयाच्या गलथान कारभाराच्या चौकशीसाठी समिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 16:21 IST

कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वृत्ताची दखल घेत, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना मंगळवारी पाचारण करून त्यांची कानउघाडणी केली .

अकोला: प्राध्यापक वर्ग शिकवित नाहीत. तासिका घेत नाहीत, अशी तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यावरच गुन्हा दाखल केल्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयाच्या गलथान कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका असे वृत्त लोकमतने मंगळवारी प्रकाशित केले. या वृत्ताची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दखल घेत, प्राचार्य व प्राध्यापकांवर कारवाई करणार असून, नागोराव राऊत या विद्यार्थ्यावरील अन्याय दूर करुन तसेच चौकशी समिती गठीत करण्यात येईल, असे स्पष्ट केले.निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयात कारभार ढेपाळला आहे. लाखो रुपये अनुदान मिळूनही विद्यार्थ्यांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नाहीत. प्रात्यक्षिकाच्या नावाखाली विद्यार्थी, विद्यार्थिनींना निंदण-खुरपण, वखर-डवरण्यासह गुरे राखण्यासारखी कामे करावी लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. तसेच कृषी तंत्र विद्यालयातील नागोराव राऊत या विद्यार्थ्याने तक्रार केल्यावर, कृषी विद्यापीठातून चौकशीसाठी आलेल्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने वाद घातल्यावर त्याच्याविरुद्ध बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. याबाबत लोकमतने सोमवारी कृषी तंत्र विद्यालय जाऊन आढावा घेतला असता, या ठिकाणी गलथान कारभार सुरू असल्याचे दिसून आले होते. याबाबतचे वृत्त मंगळवारी प्रकाशित झाल्यावर, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी वृत्ताची दखल घेत, संबंधित विद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांना मंगळवारी पाचारण करून त्यांची कानउघाडणी केली आणि पडीत शेती, चाºयाअभावी कृश झालेले पशुधन, बंद पडलेल्या वसतिगृहाबाबत जाब विचारला. तसेच प्राचार्यांना यासंदर्भात लेखी खुलासा मागविला आहे. (प्रतिनिधी)निंबी मालोकार येथील कृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभाराची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर दोषींवर कारवाई करू. तसेच त्या विद्यार्थ्यावर झालेला अन्याय दूर करण्यात येईल आणि कृषी व तंत्र विद्यालयाची इमारत, वसतिगृह बांधकामासाठी ४ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात येईल.-डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठकृषी तंत्र विद्यालयातील गलथान कारभाराची चौकशी करण्यासाठी बुधवारी अकोल्यात येणार आहे. पडीत जमीन, विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल कृषी विद्यापीठाकडे पाठपुरावा करुन दोषींवर कारवाईसाठी शिफारस करु.- विनायक सरनाईक, सदस्य, कार्यकारी परिषद, पं.दे.कृ.वि.

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ