शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलाच्या जागेवर अवैध वीटभट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:37 IST

बाळापुरातील दुर्लक्षित क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवर वीट उत्पादकाने अवैध वीटभट्टी सुरू केल्याचे लोकमतने २१ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना सुरूअसलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. 

ठळक मुद्देदिरंगाईमुळे क्रीडा संकुल रखडले हस्तांतरण प्रक्रियेसाठी क्रीडा अधिकार्‍यांची अनास्था!

अनंत वानखडे। लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर: बाळापुरातील दुर्लक्षित क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेवर वीट उत्पादकाने अवैध वीटभट्टी सुरू केल्याचे लोकमतने २१ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना सुरूअसलेल्या या वीटभट्टीवर महसूल विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. शहरात क्रीडा संकुल व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेच्या बाजूची बाभुळखेड शेत शिवारातील सर्व्हे नं. ८४ मधील १ हेक्टर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. जागा सरळ करण्यासाठी नगर परिषदेने लाखो रुपये खर्च केले. ही जागा तालुका क्रीडा संकुलासाठी नगर विकास आराखड्यात मंजूर आहे. ही जागा मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडून ५१ हजार रुपये मोजणी फी भरून मोजणी झाली. क्रीडा संकुलाचे काम गेल्या १५ वर्षांपासून रखडले आहे. याचा गैरफायदा वीट उत्पादकाने घेऊन तेथे अवैध वीना परवानगी वीटभट्टी सुरू केली आहे.या भट्टीपासून ३0 मीटर अंतरावर जि.प. माध्यमिक शाळा आहे. तर ७0 मीटर अंतरावर इंदूर-हैद्राबाद महामार्ग आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये महामार्गापासून २00 मीटर अंतर, तर मानवी वस्तीपासून २00 मीटरच्या वरच वीटभट्टय़ा असाव्यात. या नियमानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एकाही वीटभट्टीवर कुठलीही कारवाई नाही. उलट शासकीय क्रीडा संकुलाच्या नियोजित जागेत शाळेला व मानवी वस्तीला लागूनच वीटभट्टी सुरू असल्याने शासकीय नियमांचे धिडवडे उडवले जात असल्याचे लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आले आहे. तालुका क्रीडा संकुलाची सव्हर्ेे नं. ८४ मधील १ हेक्टर जागेची मोजणी झाली; परंतु ताबा नसल्याने वीट उत्पादक खुलेआम अतिक्रमण करून अवैध वीटभट्टी सुरू आहे. क्रीडा अधिकारी केवळ सभेसाठी येतात. क्रीडा संकुल जागेची चर्चा करतात. पुढील कारवाई करू म्हणून सांगत वेळकाढू धोरण अवलंबित आहे. २00३ पासून मंजूर क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध असताना हा प्रश्न निकाली निघत नाही, उलट या जागेवर अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण वाढत आहे. मागील १५ वर्षात एकाही लोकप्रतिनिधीने कुठल्या प्रशासकीय अधिकारी, क्रीडा अधिकार्‍यांनी पुढाकार घेता नाही. शहरात कुठलेही मैदान नसल्याने शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना मैदानापासून वंचित ठेवले जात आहे. 

संकुलाची नियोजित १ हेक्टर जागेची शासकीय मोजणी झाली. क्रीडा अधिकार्‍यांना ही जागा ताब्यात घेण्याच्या वेळोवेळी सूचना दिल्या. ताबा पावती झाल्यावर क्रीडा संकुल, क्रीडा अधिकारी यांच्या नावाने ७ /१२ वर नोंद करण्यात येईल. जागेवर अतिक्रमण क ाढण्यासाठी प्रशासकीय अधिकार्‍यांची समिती स्थापन करण्यात येईल. -दीपक पुंडे, तहसीलदार, बाळापूर

टॅग्स :Balapurबाळापूर