शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची अवैध वाहतूक जोरात; शासनाच्या महसुलास चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 12:07 IST

ळूच्या स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलास चुना लागत आहे.

- संतोष येलकर

अकोला : वाळू घाटांचे लिलाव अद्याप रखडलेलेच असून, राज्यातील सर्वच जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मात्र जोरात सुरू आहे. त्यामुळे वाळूच्या स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाच्या तिजोरीत जमा होणाऱ्या कोट्यवधींच्या महसुलास चुना लागत आहे.गतवर्षी लिलाव करण्यात आलेल्या वाळू घाटांची मुदत गत ३० सप्टेंबर रोजी संपली असून, राज्यातील नवीन वाळू धोरण ३ सप्टेंबर २०१९ रोजी शासनामार्फत निश्चित करण्यात आले. त्यानंतर चालू आर्थिक वर्षातील वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाळा पश्चात वाळू घाटांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया मात्र अद्याप सुरू करण्यात आली नाही. राज्यातील सर्वच जिल्ह्यात वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया रखडली असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून मात्र वाळूची अवैध वाहतूक जोरात सुरू आहे. वाळूची अवैध आणि विक्रीतून वाळू माफियांची चांगलीच चांदी होत असून, वाळूच्या स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाच्या तिजोरीत जमा होणारा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे. त्यामुळे रखडलेली वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया केव्हा मार्गी लागणार आणि लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून सुरू असलेली वाळूची चोरी केव्हा थांबणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.वाळू चोरीमुळे बुडणार शासनाचा महसूल!वाळू घाटांचा लिलाव अद्याप करण्यात आला नसला तरी; वाळूची अवैध वाहतूक होत आहे. लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची चोरी होत आहे. त्यामुळे वाळूच्या ‘रॉयल्टी’ पोटी शासनाला मिळणारा महसूल यावर्षी बुडणार आहे.वाळू टंचाईत रेंगाळली बांधकामे!जानेवारी महिना उलटून जात असला तरी; वाळू घाटांचे लिलाव रखडलेलेच आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या वाळू टंचाईच्या परिस्थितीत इमारतींची बांधकामे रेंगाळली आहेत. वाळूअभावी प्रामुख्याने घरकुलांसह शासकीय इमारती व खासगी इमारतींची बांधकामे रखडली आहेत.जिल्ह्यातील वाळू घाटांचे पावसाळा पश्चात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, लिलावायोग्य वाळू घाटांची किंमत निश्चित करून विभागीय आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय पर्यावरण मूल्यांकन समितीची परवानगी प्राप्त झाल्यानंतर वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग