अकोला : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी आठ वाहने पकडून, वाहनधारकांकडून १ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्याची कारवाई अकोला तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने शनिवारी केली.गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना चार ट्रक व चार ट्रॅक्टर भरारी पथकाने विविध ठिकाणी पकडून, वाहन मालकांकडून १ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये एमएच २७ एक्स ४६५२, एमएच ३० ए-८८३२, एमएच ३० एल-१७२०, एमएच ३० बी-२२३१, एमएच ३० ई-७८६४, एमएच ३० ई-५२३५, एमएच ४३ ई-२९२५ व एमएच १५ एजी-३६८९ इत्यादी क्रमांकांच्या आठ वाहनांचा समावेश आहे. गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारी ही आठ वाहने पकडल्यानंतर वाहनमालक सुरेश मोरवाल, प्रमोद पूणाजी घोंगे, दीपक नामदेव झरे, विपुल वासुदेव आवारे, हाफिजोद्दीन कायमुद्दीन, आकाश जोशी, शेख रफीक शे.मजीद व सदानंद तायडे इत्यादी आठ जणांकडून एकूण १ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामध्ये चार ट्रक मालकांकडून प्रत्येकी १८ हजार ४०० रुपये आणि चार टॅ्रक्टर मालकांकडून प्रत्येकी ९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांच्या निर्देशानुसार तहसीलदार दिनेश गीते यांच्यासह मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ही कारवाई केली.
गौण खनिजाची अवैध वाहतूक
By admin | Updated: May 10, 2014 22:20 IST