शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक जोरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:08 IST

प्रती ब्रास सहा ते सात हजार रुपये दराने वाळूची विक्री करण्यात येत असून, वाळू विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया आपली चांदी करून घेत आहेत.

अकोला: जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक जोरात सुरू आहे. त्यामुळे वाळूपासून शासनाला मिळणाऱ्या स्वामित्वधन शुल्काला (रॉयल्टी) चुना लागत असताना, वाळूच्या अवैध वाहतूकसंदर्भात कारवाई करण्याकडे मात्र महसूल यंत्रणेकडून कानाडोळा करण्यात येत आहे.जिल्ह्यात केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव करण्यात आलेल्या वाळू घाटातून वाळूचे उत्खनन आणि वाळू वाहतूक करण्याची मुदत येत्या ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे; परंतु जिल्ह्यात लिलाव करण्यात आला नाही, अशा बहुतांश वाळू घाटात अवैध उत्खनन करून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. वाळू माफियांकडून वाळूचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक जोरात सुरू असल्याने, वाळूपासून स्वामित्वधन शुल्कापोटी (रॉयल्टी) शासनाच्या खात्यात जमा होणाºया महसुलास चुना लागत आहे. जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन आणि अवैध वाहतूक सुरू असताना, यासंदर्भात कारवाई करण्याकडे मात्र महसूल विभागांतर्गत तहसीलस्तरावरील यंत्रणेकडून कारवाई करण्याकडे कानाडोळा होत आहे.पहाटेच्या वेळी होते वाळूची अवैध वाहतूक!जिल्ह्यातील सातही तालुक्यात पहाटे ३ ते सकाळी ७ या वेळेत वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. प्रती ब्रास सहा ते सात हजार रुपये दराने वाळूची विक्री करण्यात येत असून, वाळू विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया आपली चांदी करून घेत आहेत.वाळूची अवैध साठवणूकही वाढली!जिल्ह्यात लिलाव न झालेल्या वाळू घाटात अवैध उत्खनन आणि वाहतूक करून वाळूची अवैध साठवणूकही वाढली आहे. पावसाळा सुरू असल्याने, खुल्या जागेवर वाळूची अवैध साठवणूक करण्यात येत आहे. अवैधरीत्या साठवणूक केलेल्या वाळूची चोरट्या मार्गाने विक्री केली जात आहे.२० दिवसांत खनिकर्म विभागाने पकडली ९ वाहने!गत ४ ते २५ जुलैदरम्यान या २० दिवसांच्या कालावधीत जिल्हा खनिकर्म विभागाने वाळूची अवैध वाहतूक करणारी ९ वाहने पकडून १६ लाख ४५ हजार ८०० रुपये दंड वसुलीची कारवाई करण्यात आली. महसूल विभागांतर्गत तालुकास्तरावरील पथकांकडून मात्र वाळू अवैध वाहतूक संदर्भात कारवाई करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे.वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच यासंदर्भात कारवाई करण्याकरिता जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयस्तरावरील भरारी पथके अधिक सक्रिय करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.-डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी

 

टॅग्स :Akolaअकोलाsandवाळू