पिंजर: बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर येथे सर्रासपणे पेट्रोलची अवैध विक्री केली जात असून, पोलिस प्रशासनाचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.पिंजर येथील पोलिस स्टेशनला लागूनच बसस्थानक असून, गत काही दिवसांपासून या परिसरात पेट्रोलची अवैध विक्री सर्रासपणे केली जात आहे. पोलिस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर अशा प्रकारचे धंदे सुरू असतानाही पोलिसांना त्याची माहिती नसावी, याबाबत जनतेकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पिंजर येथे जवळपास १५ ते २० ठिकाणी पेट्रोलची अवैध विक्र ी केली जात आहे. पिंजर येथे पेट्रोलच्या अवैध विक्रीसह इतरही अवैध धंदे जोरात सुरू आहेत. त्यामुळे पिंजर येथील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असून, स्थानिक पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पिंजर येथील अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
पेट्रोलची अवैध विक्री
By admin | Updated: May 20, 2014 19:12 IST