शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पोळा चौकात अवैध नळजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:32 IST

परमिट नसलेल्या ऑटाेमुळे वाहतुकीची कोंडी अकोला : कोरोनाच्या अनुषंगाने शहरात लॉकडाऊन लागू झाले असून, सकाळी ७ ते दुपारी ३ ...

परमिट नसलेल्या ऑटाेमुळे वाहतुकीची कोंडी

अकोला : कोरोनाच्या अनुषंगाने शहरात लॉकडाऊन लागू झाले असून, सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत रहदारीच्या मार्गावर ऑटाे चालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. यामध्ये शहराचा परवाना नसलेल्या ऑटोची संख्या लक्षणीय असून, त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे वाहतूक शाखा पोलीस लक्ष देतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

अकोला : जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या गोडबोले उद्यानजवळ मार्गावर बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून आहे. यामध्ये रेती, वीटा, गिट्टीचा समावेश असून, अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज आहे.

संचारबंदी असताना बॅरिकेट्चा खटाटोप

अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले असून, दुपारी ३ नंतर रस्त्यांवर शुकशुकाट पसरतो. अशा स्थितीत पोलीस प्रशासनाने शहरातील गांधी चौक, खदान पोलीस ठाणे यांसह प्रत्येक मुख्य चौकात बॅरिकेट्स उभारले आहेत. या बॅरिकेट्समुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता, पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेट्स हटविण्याची मागणी हाेत आहे.

अकोटफाइल चाैकात खोदला खड्डा

अकोला : शहरातील अकोटफाइल चाैकात साफसफाई अभावी प्रचंड घाण व कचरा साचली आहे. या चौकात मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला असून, मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला : सातव चाैकातील मुख्य रस्त्यालगत जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्हे पाहता, तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

नागरिकांसाठी ‘ओपन स्पेस’ मोकळ्या करा!

अकाेला : शहरात ले-आऊटचे निर्माण करताना, त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवणे गरजेचे आहे. बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वयोवृद्ध नागरिक, लहान मुलांसाठी अशा खुल्या जागा विकसित करण्याची मागणी हाेत आहे. याकडे सत्तापक्षाचे दुर्लक्ष होत आहे.

पार्किंगची निविदा राबवा

अकोला : शहरात पार्किंगच्या जागेवर उभारलेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकरांची कुचंबणा हाेत आहे. प्रशासनाने ही समस्या दूर करण्याची मागणी होत आहे. नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत आहे. मनपाने पार्किंगसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘दररोज पाणीपुरवठा करावा’

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे, परंतु दैनंदिन पाणीपुरवठा हाेत नसल्याने, अकाेलेकरांमध्ये नाराजी आहे. मनपाने दररोज पाणीपुरवठा करण्याची मागणी प्रभाग १मधील नायगाव येथील रहिवाशांनी केली आहे.