शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी; कर्मचार्‍यांची लवकरच ठाण्यात पेशी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 02:03 IST

अकोला : महापालिकेतील कर्मचार्‍यांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत वेतन मिळत नसतानाही येथील कर्मचार्‍यांनी अवैध सावकारी जोरात सुरू केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या अवैध सावकारी करणार्‍या कर्मचार्‍यांना लवकरच पोलीस ठाण्यात हजर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यांचे बयान नोंदविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकर्मचार्‍यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेतील कर्मचार्‍यांना पाच ते सहा महिन्यांपर्यंत वेतन मिळत नसतानाही येथील कर्मचार्‍यांनी अवैध सावकारी जोरात सुरू केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या अवैध सावकारी करणार्‍या कर्मचार्‍यांना लवकरच पोलीस ठाण्यात हजर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, त्यांचे बयान नोंदविण्यात येणार असल्याची माहिती आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने येथील कर्मचार्‍यांना दर महिन्याचे वेतन वेळेत मिळत नाही. उदरनिर्वाहाचे कारण समोर करून वेतन मागण्यासाठी वारंवार आंदोलन करण्यात येते. मात्र, वस्तुस्थिती काही वेगळीच असून, येथील कर्मचार्‍यांना वेतन वेळेत मिळत नसतानाही त्यांची अवैध सावकारी मात्र कोट्टय़वधींच्या घरात असल्याचे पोलीस तक्रारीतून समोर आले आहे. असेच एक त्रस्त झालेले सेवानवृत्त कर्मचारी गजानन झारकर यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठून महापालिकेतील कर्मचारी व त्यांचे बाहेरील साथीदार, अशा १४ जणांविरुद्ध अवैध सावकारी अधिनियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. या कर्मचार्‍यांनी बेहिशेबी मालमत्ता गोळा केली असून, त्यांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी तक्रारीतून केली आहे. सिटी कोतवाली पोलिसांनी आता अवैध सावकारी करणार्‍या कर्मचार्‍यांना ठाण्यात हजर होण्याचे निर्देश दिले असून, त्यांचे लवकरच लेखी बयान घेण्यात येणार आहे. या कर्मचार्‍यांचे बयान नोंदविल्यानंतर त्यांची वेतनाची व अन्य चौकशी आयकर विभागाकडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या अवैध सावकारी करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा उपनिबंधक कार्यालय झोपेत!अवैध सावकारी करणार्‍या महापालिकेतील कर्मचार्‍यांची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, तालुका उपनिबंधक व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला या विषयाशी देणे-घेणे नसल्याच्याच तोर्‍यात ते वावरत आहेत. केवळ ‘मलाई’ मिळणार्‍या प्रकरणात छापेमारी आणि कारवाईचा गाजावाजा करणार्‍या या विभागाच्या अधिकार्‍यांनी या गंभीर प्रकरणात मात्र अद्यापही लक्ष घातलेले नाही. अवैध सावकारीची तक्रार करणार्‍या व्यक्तीची तक्रारही या कार्यालयात घेतल्या गेली नसल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर