अकोला: राज्यभरातील महापालिका, नगरपालिका क्षेत्रात उभारलेल्या अवैध होर्डिंग, बॅनर व फलकांमुळे शहर विद्रूप झाल्याप्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या २४ नोव्हेंबर रोजी सुनावणी होत आहे. याकरीता मनपा व नगरपालिक ांच्यावतीने शपथपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अवैध बॅनर, होर्डिंग व फलकांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शहरं व्रिदूप झाली असून, अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत सुस्वराज्य फाऊंडेशनच्यावतीने सातारा येथील जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही स्थिती संपूर्ण राज्यातच असल्याचे फाऊंडेशनच्यावतीनेनमुद करण्यात आल्याने यासंदर्भातील सर्व याचिका एकत्र करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील महापालिका व नगरपालिकांच्या प्रलंबित याचिका एकत्रीत करण्यात आल्या. मध्यंतरी अवैध बॅनर, होर्डिंगच्या मुद्यावर महापालिका व नगरपालिकांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले. त्यानुसार शपथपत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर येत्या २४ नोव्हेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार असून, शासनाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अँड.गिता शास्त्री बाजू मांडणार आहेत.
अवैध होर्डिंग्सप्रकरणी २४ ला सुनावणी
By admin | Updated: November 14, 2014 01:12 IST