शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

के. एस. पाटील हॉस्पिटलवर चालला गजराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:06 IST

श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील हॉस्पिटलवर गुरुवारी अकोला महापालिकेचा गजराज चालला. अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई सकाळी               ८ वाजताचे दरम्यान केली. डॉ. अभय पाटील यांच्या हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ  उडाली आहे.

ठळक मुद्देमनपाची धाडसी  कारवाई ४३१ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील हॉस्पिटलवर गुरुवारी अकोला महापालिकेचा गजराज चालला. अतिक्रमण हटाव पथकाने ही कारवाई सकाळी               ८ वाजताचे दरम्यान केली. डॉ. अभय पाटील यांच्या हॉस्पिटलवर झालेल्या कारवाईमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ  उडाली आहे.    टॉवर-रतनलाल प्लॉट मार्गावरील स्कायलार्क हॉटेलजवळच्या श्रावगी प्लॉटस्थित डॉ.के.एस. पाटील यांचे हॉस्पिटल आहे. अस्थीरोग तज्ज्ञ अभय पाटील आणि स्त्रीरोग तज्ज्ञ रेखा पाटील या हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवा देतात. पाटील यांच्या नझुल शिट क्रं.५२ , नझुल भूखंड क्रं.६/२ मध्ये एकूण १0४५ चौरस मीटर मंजूर नकाशा आहे. मात्र प्रत्यक्षात पाटील यांनी १४७६ चौरस मीटर बांधकाम केलेले आहे. यासंदर्भात २0१५ पासून त्यांना नोटिस दिल्या गेल्यात; परंतु त्याची दखल पाटील यांनी घेतली नाही, अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली. ४३१ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आल्याने मनपा प्रशासनाने गुरुवारी सकाळी दोन जेसीबी लावून ही कारवाई केली. ठाणेदार अन्वर शेख पोलीस ताफ्यासह येथे हजर होते. मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपायुक्त डॉ. दीपाली भोसले, उपायुक्त समाधान सोळंके, विभागीय अधिकारी अनिल बिडवे, राजेंद्र घनबहादूर, संदीप गावंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अतिक्रमित टीनशेड जमीनदोस्त करण्यात आले असून शेजारील औषधी दूकानांचे बांधकाम पाडण्यात आले. 

स्वत:च पाडले फुलारीगल्लीतील अतिक्रमण अकोला शिट क्रं.३९ बी.नझुल प्लॉट क्रं.२३६ मोहम्मद अली चौकातील फुलारी गल्लीमध्ये अफसर खान तालेबान खान यांचे अनधिकृ त बांधकाम आहे. सै. याकूब सै. कासम आणि सै. कासम सै. लतिफ यांनी या अनधिकृत बांधकामाची तक्रार  मनपात केली होती. अतिक्रमण हटाव पथक कारवाईसाठी येत असल्याचे कळताच खान परिवाराने स्वत:हून अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे मनपा प्रशासनाने कारवाई केली नाही.-